December 29, 2024
खामगाव

वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

खामगांव : लॉकडाऊनचे उल्लंनघन करणे एका तरुणाच्या जीवावर चांगलेच अंगलट आले आहे. चक्क लॉकडाऊन च्या नियमांना धाब्यावर बसवून जवळपास १४ ते १५ मित्र वाढदिवस साजरा करण्याकरिता एकत्र जमले होते व त्यातील एक तरुण शेतातील विहिरीत आंघोळी साठी गेला असता पाण्यात बुडून त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
खामगांव येथील रहीवासी असलेले १४ ते १५ इसम हे १९ मे रोजी मित्राच्या वाढदिवसानिमीत्ताने पार्टी करण्यासाठी खामगाव तालुक्यातील चिखली बू. शिवार पोस्टे जलंब येथे विठ्ठल लाऊडकर यांच्या शेतात जमले होते. बाजूला विहीर असल्याने त्यांच्या पैकी दिपक शर्मा वय (३७) रा. निळकंठ नगर, खामगाव हा विहीरीत आंघोळीसाठी गेला असता बराच वेळ परत न आल्याने त्याचा इतरांनी शोध घेतला मात्र तो दिसला नाही. तो विहीरीतच आहे की बाहेर आला?  हे निश्चित कुणास माहिती नसल्याने जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी. आर. इंगळे यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत  ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दिपक शर्माने अंगातील काढून ठेवलेले कपडे बाजुलाच असल्याने तो विहीरीत च असणार असा अंदाज बांधून विहिरीमध्ये शोधकाम सुरु केले. विहिरी ला सुमारे ३० फुट खोल पाणी असल्याने  सर्वप्रथम विहीरीचे पाणी उपसणे सूरू केले  आणि बाजुच्या गावात राहणारे गोतखोर(पाण्यात पोहणारे) प्रकाश खवले तसेच संतोष धोटे रा. माटरगाव यांना बोलावून त्यांच्या मदतीने विहीरीत दिपक शर्मा याला शोधण्याचे कार्य सुरू केले असता तळाशी दिपक चा म्रूतदेह त्यांना सापडला. तो विहिरी च्या बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला यावेळी चांगलीच कसरत करावी लागली. मृत दिपक शर्मा याचे सोबतच पार्टी करीता आलेले त्याचे नातेवाईक प्रशांत शंकर शर्मा यांच्या रिपोर्ट वरुन पोस्टे जलंब येथे मर्ग दाखल करुन चौकशीत घेण्यात आला आहे.

सध्या कोवीड १९ साथीचे रोग पसरू नये याकरीता शासन वेळोवेळी करीत असलेल्या नियमांचे पालन न करता, कोणत्याही परवानगी शिवाय केवळ वाढदिवस पार्टी करीता एकत्र जमणारे १४ जणांविरुद्ध पोस्टे जलंब येथे नियमांचे उल्लंघन बाबत गून्हा दाखल करण्यात आले अशी माहिती जलंब पोलिस स्टेशन चे ठाणेदार इंगळे यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना दिली आहे.

Related posts

पत्रकारांची बदनामी करणाऱ्या डॉ.पांडुरंग हटकर विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी,पत्रकारांनी दिले निवेदन

nirbhid swarajya

माझ भाग्य़ आहे की शेतकऱ्यांसाठी आंदोलन करुन माझा वाढदिवस साजरा करीत आहे – ॲड.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

नंद टॉवर येथील डॉक्टरसह १० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!