चिखली : बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कोलारा येथे पतीने दारूच्या नशेत पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यामुळे कोलारा गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
निवृत्ती सोळंकी हा नेहमीच दारूच्या नशेत राहत असल्याने त्याची ४० वर्षीय पत्नी मृतक पार्वती सोळंकी यांच्यात नेहमीच भांडण व्हायचे, काल रात्री सुद्धा निवृत्ती हा दारूच्या नशेत असल्याने पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते आणि रागाच्या भरात निवृत्ती ने आपली पत्नी पार्वती हिला जबर मारहाण करून तिचा गळा दाबून हत्या केली सकाळी जेव्हा बाजूच्या खोलीत झोपलेल्या मुलाने त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार उघडकीस आला आणि गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व संशयित आरोपी निवृत्ती सोळंकी याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर तपासानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.