November 21, 2025
सिंदखेड राजा

आईसह २ मुलांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले

आत्महत्या कि घातपात? पोलिसांचा शोध सुरु

सिंदखेडराजा : बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील दोन चिमुकल्यांसह एका विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना आज सकाळी दुसरबीड येथ उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुसरबीड येथील २८ वर्षीय  स्वाती अमोल जगदाळे ही विवाहिता १७ मे च्या रात्रीपासून  ११ वर्षीय मुलगा गणेश आणि ९ वर्षीय मुलगी मयुरी ह्यांना शौचास नेते म्हणून घरातून बाहेर गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही, म्हणून कुटुंबीयांसह इतरांनी रात्रभर तसेच काल दिवसभर तिघांचाही प्रत्यक्ष तसेच  संपर्काद्वारे शोध घेतला मात्र तिघेही आढळून आले नाहीत. शेवटी आज सकाळी दुसरबीड गावानजीक मेहकर मार्गाला लागून असलेल्या सार्वजनिक विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात माहिती कळताच किनगावराजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतक महिलेचा पती अमोल जगदाळे ह्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, मात्र या तिघांसोबत काही घातपात घडला कि हि आत्महत्या आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

Related posts

बजेटमध्ये विदर्भाच्या वाटयाला वाटाण्याच्या अक्षदा- आ.फुंडकर

nirbhid swarajya

जिल्ह्यात वाजणार ग्रामपंचायत निवडणूक चे बिगुल…

nirbhid swarajya

समृद्धी महामार्गाच्या टिप्पर ला भीषण अपघात

nirbhid swarajya
error: Content is protected !!