January 1, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा

जिल्ह्यातील 15 मद्य विक्री परवाने कायमस्वरूपी रद्द

मुंबई दारूबंदी कायद्यातंर्गत जिल्हाधिकारी यांची कारवाई

बुलडाणा : राज्यात कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याबाबत आदेश दिले होते. सदर टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही अनुज्ञप्तीधारकांविरोधात जिल्हाधिकारी यांना अवैधपणे मद्यविक्री करीत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक बी. व्ही पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर अनुज्ञप्त्यांचे सखोल निरीक्षण केले. आढळून आलेल्या गंभीर स्वरूपाच्या नियमभंग प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज 18 मे 2020 रोजी सदर प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारीत करून मुंबई दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये 15 अनुज्ञप्त्या अर्थात मद्य विक्री परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. तसेच पाच प्रकरणे ही सौम्य स्वरूपाची असल्यामुळे या प्रकरणांमध्ये दंड आकारण्यात आलेला आहे, असे अधिक्षक बा. वि पठारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या अनुज्ञप्त्या कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्या :

आर. जी सानंदा सीएल 3 अनुज्ञप्तीधारक खामगांव, डी. टी देशमुख सीएल 3 अमडापूर ता. चिखली, जी. एम सानंदा सीएल 3 लाखनवाडा ता. खामगांव, श्रीमती माधुरी राजेश बोबडे प्रोप्रा हॉटेल गौरव एफएल 3 खामगांव, मे. चौधरी वाईन शॉप एफएल 2 चिखली, श्रीमती प्रतिभा प्रकाश लोखंडकार प्रोप्रा. हॉटेल ग्रीनपार्क एफएल 3 खामगांव, श्रीमती रितादेवी गोपालदास चौधरी प्रोप्रा. हॉटेल चौधरी रेस्टॉरंट एफएल 3 खामगांव, श्रीमती सुनिता चंद्रकांत डवले प्रोप्रा. हॉटेल राधेय एफएल 3 मलकापूर, शे. शाहरूख शे. महम्मंद प्रोप्रा. हॉटेल नॅशनल एफएल 3 डोणगांव ता. मेहकर, अर्जुन पांडुरंग गरड प्रोप्रा. हॉटेल पॅराडाईज एफएल 3 खामगांव, किशोर पांडुरंग गरड प्रोप्रा. हॉटेल पवन एफएल 3 सुटाळा ता. खामगांव, श्रीमती प्रितमकौर जसवंतसिंग पोपली प्रोप्रा. हॉटेल दशमेश एफएल 3 सजनपूरी ता. खामगांव, विशाल शाम गरड प्रोप्रा. मे. पी. एच बिअरशॉपी एफएल /बीआर 2 सुटाळा ता. खामगांव, गोपालदास बाबुलाल चौधरी प्रोप्रा. मे. एम. आर चौधरी वाईन शॉप एफएल 2 खामगांव आणि मे. स्वस्तिक एजन्सी भागीदार ए. व्ही. राजपूत व ए. जी. सानंदा एफएल 2 सुटाळा ता. खामगांव.

सौजन्य : जिमाका

Related posts

शिवसेनेचा चिखली येथे शेतकरी मेळावा उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

nirbhid swarajya

वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुलाने केले भोजन वाटप

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 339 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 75 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!