January 4, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ०४ कोरोना अहवाल निगेटिव्ह ; ३ पॉझिटिव

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त ०७ रिपोर्ट पैकी ०४ रिपोर्ट निगेटिव्ह असून ०३ रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. आतापर्यंत ६८५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात या तीन बाधीत रुग्णांसह २९ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी एक मृत आहे. आतापर्यंत २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे. सध्या रूग्णालयात पाच कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत आहे.
तसेच आज १७ मे रोजी ०७ अहवाल प्राप्त झाले आहेत. तीन अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये खामगांव येथील ६० वर्षीय महिला, शेगाव येथील ३५ वर्षीय पुरुष आणि नरवेल, ता. मलकापूर येथील ७ वर्षीय मुलीचा समावेश आहे. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ६८ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

लॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली

nirbhid swarajya

महिलेला मोबाइलवर ट्रिपल तलाक दिल्या प्रकरणी औरंगाबादचे 4 जणांवर गुन्हा दाखल

nirbhid swarajya

निशब्द केल भाऊ…..

nirbhid swarajya
error: Content is protected !!