January 4, 2025
लोणार

विद्युत झटक्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

लोणार : लोणार तालुक्यातील हिरडव येथील धरणावरील मोटारीचा विद्यूत शॉक लागुन पिता-पुञाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सकाळ च्या सुमारास घडली.
सदर घटनेची माहीती गावात पसरल्याने गावकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. हिरडव येथील जनार्धन निवृत्ती मैराळ (५०) व निलेश जनार्धन मैराळ (३४) हे हिरवड लगत असलेल्या धरणावर शेती सिंचनासाठी लावण्यात आलेला कृषी पंप थोडा मागे सरकविण्यासाठी पहाटे गेले होते. या धरणातील बॅक वॉटर चा शेती सिंचनासाठी शेतकरी उपयोग करतात. मात्र उन्हाळ्यामुळे व पाण्याचा जास्त उपसा होत असल्याने बॅक वॉटर कमी झाले होते परिणामी शेतीला पाणी देण्यासाठी अडचण येत असल्याने मोटार सरकवण्यासाठी धरणावर गेले असता विद्युत शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच पो. कॉ. सुरेश काळे आणि दिपक केसकर घटनास्थळावर हजर झाले होते व पोलिसांचे पुढील तपासकार्य सुरु आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

Related posts

‘मुंबईसह राज्यातून होणारा हिरे व्यापार ९७ टक्क्यांवर पोहोचला, मुंबईसमोर सूरतही मागे पडले’

nirbhid swarajya

जागतिक परिचारिका दिनीच परिचारीकेचा आदर्श विवाह

nirbhid swarajya

सैनिकांसाठी प्रॉपर्टी संदर्भात विनामूल्य सेवा

nirbhid swarajya
error: Content is protected !!