October 6, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त १७ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त १७ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ६६३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २५ रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  आतापर्यंत २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे.  सध्या रूग्णालयात एक कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत आहे. सदर रूग्ण जळगांव जामोद येथील ४५ वर्षीय पुरूष आहे.    तसेच आज १४ मे रोजी १७ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व १७ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने २२ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६६३ आहेत. त्याचप्रमाणे आज मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा येथील ८ वर्षीय मुलगी पहाटे खाजगी वाहनाने मुंबई येथून घरी आल्याचे प्रशासनाला कळाले. सदर मुलगी आज आयसीएमआर (इंडियन कॉन्सील ऑफ मेडीकल रिसर्च) च्या पोर्टलवर पॉझीटीव्ह दर्शविण्यात आली आहे. ही मुलगी मुंबई येथील रूग्णालयात उचाराकरीता भरती होती. तिचा स्वॉब कोविड -१९ साठी घेण्यात येऊन तो प्रयोगशाळेत  तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. अहवाल प्राप्त होण्यापूर्वी सदर मुलीला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली, मात्र ती मुंबई येथेच कोविड -१९ पॉझीटीव्ह आढळून आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न

nirbhid swarajya

अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समाज सेवा मंडळ च्या वतीने छत्रपती श्री शिवरायांना अभिवादन

nirbhid swarajya

खामगांव सामान्य रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!