January 7, 2025
आरोग्य विविध लेख

कोरोना शी लढतांना डॉक्टरांना अश्रू अनावर…

साक्षी गोळे पाटील (खामगांव) : कोरोना च्या लढयात कोरोना बाधित असलेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि नर्सिंग कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. ‘आरोग्य सैनिक’ असलेले हे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी अहोरात्र काम करीत असूनही त्यांची त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. उलट वैद्यकीय क्षेत्रात येताना घेतलेली शपथ सतत डोळ्यासमोर ठेवून त्यांचे ‘कोरोना’ सोबतचे युद्ध सुरु आहे. डॉक्टर्स त्यांच्या कामाच्या वेळे शिवाय १२ ते १५ तास काम करीत आहेत. रुग्णांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना कंटाळा येणार नाही, त्यांच्या रागाचा पारा चढणार नाही याची काळजी घेत त्यांना शांत ठेवण्याचे कामही त्यांना करावे लागत आहे.

घरामधून निघताना डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय मात्र चिंताग्रस्त झालेले असतात. घरामधून बाहेर पडताना ‘जरा जपून, काळजी घ्या’ असे सांगायला कुटुंबिय विसरत नाहीत. काळजामध्ये कालवाकालव करणारी ती वाक्य तिथेच उंबऱ्यात सोडून आपल्या ‘कर्तव्या’ वर हजर होणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या भावना देखील जाणून घ्यायला कोणीही तयार नाही! या गोष्टीचा विचार करून निर्भिड स्वराज्य च्या टीम ने बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की जणू काही तेच क्वारंटाईन आहे असे जीवन ते जगत आहे. या कोरोना च्या स्थितीचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर देखील झालेला आहे. वयोवृद्ध आई वडील, पत्नी आणि त्यांच्या चिमुकल्या मुलीला त्यांना कोरोना चे संकट आल्यापासून भेटता ही आले नाही. हे सर्व सांगत असतांना त्यांना अश्रू अनावर झाले… आपल्या मुलीपासून जवळ च असतांना, आपण तिला स्पर्श करू शकत नाही हा किती वेदनादायक क्षण!

घरात वेगळ्या खोली मध्ये जेवण करावे लागते, वेगळ्या खोलीत झोपावे लागते. सोबतच रुग्णालयात असताना ते व स्टाफ मिळून रुग्णालयात येणाऱ्या संशयित व्यक्तींची माहिती लिहून घेणं, तपासणीसाठी पाठवणं, आवश्यकता असेल त्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांना होणाऱ्या त्रासावर उपचार करने, सध्या जळगांव जामोद येथील एक पॉझीटीव्ह रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे या रुग्णांची सेवा, त्यांच्या आहाराची काळजी, त्यांची मनस्थिती नीट राहील याची काळजी असे कित्येक कामे दिवसभरात चालू असतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निर्भिड स्वराज्य टीम ला सांगितलेल्या ह्या गोष्टी एकूण मन अगदी खालावून गेले. आरोग्य यंत्रना तर कार्यरत आहेच पण पोलीस प्रशासन, महसूल कर्मचारी, सफाई कर्मचारी सर्व आपल्या जीवाचे रान करून कोरोना च्या संकटात लढा देत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा ही सर्वच धार्मिक स्थळं बंद आहेत. पण देव डॉक्टर, नर्सेस, पोलीस यांच्या रुपात संपूर्ण जनतेची रक्षा करत आहे. युद्धाच्या वेळी जसं सैनिकांचं महत्त्व लक्षात येतं, तसं आजच्या परिस्थितीत डॉक्टरांचं महत्त्व सर्वांच्या लक्षात घ्यावं लागेल कारण आजची परिस्थिती ही युद्धासारखीच आहे. कोरोना वॉरियर्स
हे सर्व ते कोणासाठी करतायेत? फक्त आणि फक्त आपल्यासाठी! सामान्य लोकांसाठी. आपणही त्यांना सहकार्य करून त्यांच्या कार्या प्रती संवेदन शिलता दाखवायला हवी. खामगांव चे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ या कोरोना विषाणूशी लढण्यासाठी अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या या कार्याला निर्भिड स्वराज्य चा सलाम..!

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 30 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 02 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 410 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 36 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

खामगांव मधे वाढत आहे मृत्युचे प्रमाण; आज ९ जणांचा मृत्यु

nirbhid swarajya
error: Content is protected !!