January 7, 2025
विविध लेख

कोरोनामुक्त झालेल्या पत्रकाराने मांडलेला अनुभव

आमच मुळ उस्मानाबाद, त्यात कळंब म्हणजे अस्सल मराठवाडी गुण आधीपासून अंगात आहेत. म्हणजे माझ्यासारखे मराठवाड्यातले घाटी लोकं हात पाय मोडल्याशिवाय, गाडीवरून उलथल्याशिवाय किंवा दोस्तीतल्याच कुस्तीत डोकं फुटल्याशिवाय दवाखान्यात जात नाहीत त्यातलाच मी एक… मागच्या कित्तेक वर्षात स्वतासाठी दवाखान्यात शेवटच कधी गेलो ते आठवतही नाही ( एक अपवाद वगळता ) पण गेल्या २१ दिवसांपासून प्रत्यक्षात नाही पण टेक्निकली, कागदोपत्री प्रचंड आजारी होतो असच म्हणायला लागेल. विशेष म्हणजे यात पेशंट मीच, डाॅक्टर मीच, वाॅर्डबाॅयपासून ते सिस्टर मीच आणि दवाखान्यापासून ते मेडिकलही माझच. तर एवढ्या सगळ्या जबाबदार्या सांभाळून कायदेशीर रित्या मी या आजारातून आजच बरा झालोय. बस २१ दिवसानंतरच्या सर्वतोपरी ईलाजानंतर एकच प्रश्न उरलाय की एवढ सगळ करून या एकांतवासात मला झाल तरी काय होत नेमकं याचा शोध अद्यापही लागलेला नाहीये.        

थोडक्यात सांगायच म्हणल तर मागच्या महिन्यात कोव्हीड टेस्ट केली…टेस्ट करेपर्यंत ते आत्तापर्यंत कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती आणि नाहीयेत… पण तरीही कुठली टेस्ट झाली की रात्रंदिवस आमच्या डोक्या इंग्लिशचा पेपरच फिरत असतय ह नेहमीच ठरलेलय. तर मग ह्या इंग्लिशच्या पेपरनं चार दिवस आमच्या स्वप्नांचा खेळखंडोबा करून झाल्यावर एकदाचा निकाल आला…आजवर आम्ही निकाल पाॅझिटीव्ह यावा यासाठी शक्य ते सगळे जुग्गाड लावायचो पण ह्याबारीनं निकाल निगेटीव्हच येणार याची खात्री होती…पण नेमकं याचवेळी उलट झाल आणि फायनली आम्ही कोव्हीड पाॅझिटीव्ह म्हणजेच कोरोनाग्रस्तांच्या यादीत जमा झालो.

     कसलीही लक्षण नाही, त्रास नाही एका ताटात जेऊनही दिवसभर शेजारी पडून असणार्या मित्रालाही काहीच नाही तर मग मी पाॅझिटीव्ह कस काय यानं दिवसभर डोक आऊट झाल. त्यात कोरोना झालाय म्हणजे जणू वल्डकपच मिळालाय अश्या आशयाचे कौतुक करणार्या शेकडो फोननं एकाच दिवसात वैताग आणला. शेवटी वैतागून फोन बंद केला आणि आता पुढे काय याची गणित डोक्यात सुरू झाली…पुढचे कितीतरी स्वताला क्वारंनटाईन करून घ्यायच आहे एवढ कळल आणि फक्त एकट रहायच्या निस्त्या विचारानंच माझी जाम तंतरली कारण सरकारी हाॅस्पिटल्सची अवस्था, तिथली एकंदरीत परिस्थिती ही दररोज नव्यानं समोर येत होती…तिथ मी १४ दिवस एकटा कस राहणार यापेक्षा तिथे पोचायच्या आधीच मी तिथून पळून कसा कसा जाणार याचे सगळे प्लॅन्स बनवायला मी सुरूवात केली.

        क्वारंनटाईनचा पहिला दिवस अतिशय खतरनाक गेला…जोगेश्वरीच्या एका सुनसान ठिकाणी भुताटकी हाॅटेलमध्ये क्वारंनटाईन व्हायच होत तिथ पोचताच मनोमन पक्क केल की इथून पळून जायच आहे… कशी बशी रात्र काढली, कोरोना झालाय याच काहीच वाटत नव्हत पण तरीही कसलीतरी भिती रात्रभर मनात सलत होती…भितीनं नरड कोरड पडल तेव्हा कळाल की प्यायला थेंबभरही पाणी नाहीये…दरवाजा उघडून बाहेर यायची हिंमत होत नव्हती पण शेवटी असहनेबल झाल्यावर रात्री ३ वाजता थेट जोगेश्वरी पोलिस चौकीपर्यंत चालत जाऊन पाणी पिऊन आणि घेऊन आलो…सकाळी इथून पळून जायचा प्लॅन चार मित्रांना सांगितल तस त्यांनी काही वेळ दम धर जागा बदलतोय अस सांगितल. त्याच दिवशी आमची रवानगी पुढच्या क्वारंनटाईनसाठी गोरेगावमधील एका सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अश्या ४ स्टार हाॅटेलमध्ये करण्यात आली होती…तिथे पोचल्यावर कसतरी जिवात जीव आला…मस्तपैकी शाॅवर घेतलं आणि रात्रभराची झोपेची वसूली करण्यासाठी निवांत ताणून दिली.

     झोप झाल्यानंतर परत एकदा भानावर आलो कारण निदान माझ्यासाठी तरी कोरोना हा शारिरीक आजार मुळीच नव्हता तर तो एक मोठा मानसिक धक्काच होता…फोर स्टार जरी असल तरी त्या हाॅटेलची रूम हे माझ्यासाठी जेलच होती…वरवर आपण कितीही शांत वाटत असलो तरी मनात लैच कसतरी व्हायला लागल…मध्येच पोटात उगचच गोळा उठायचा…विचार करून करून कोरोनाच्या लक्षणांएैवजी येड्याची लक्षण माझी मलाच दिसाय लागली…कोरोनाच्या झाला तरी त्याची काडीचीही भिती नव्हती पण यामुळ एकटच असण्याची भिती बेसुमार बसली होती…यातच कोरोनाग्रस्त रूग्णालय मिळणारी वागणूक ही शास्त्रीयदृष्ट्या योग्य असली तरी मानसिकरित्या लै लै त्रास देऊन जायची…म्हणजे चहा नाष्टा, जेवण बेल वाजवून दरवाज्यात खाली ठेवलं जायच, यातच हे सगळ घेऊन येणारी लोक ही जणू परग्रहाहून आली आहेत अश्या सुरक्षा किटमध्ये असायची…यातल कुणीच कोणाला बोलायच नाही पण निदान त्यांचा चेहरा, हावभाव यातल काही दिसल्यावरतरी बोलल्यासारख वाटेल पण याचीही या सुरक्षा सुटमुळे सोय नसायची.

     याचा सगळ्यात मोठा त्रास म्हणजे सगळा वेळ रिकामाच असतो पण करावस काहीच अस वाटत नाही…पुस्तक वाचू वाटत नाहीत ना कुठल्या वेब सिरीज ना टिव्ही ना गाणी…बस आपल्या फक्त विचार विचार आणि विचार एवढच…त्यात आम्ही मराठवाड्याची माणसं कायम दुष्काळी जरी असलो तरी थोडंया थोड्या गोष्टींवरूनही आमच्या डोळ्यांतन टॅंकर वाहायला नेहमीच सुरूच असतात…आता तर काय एकटाच जीव त्यात कोरोनाग्रस्त आणि जिंदगीत काय कमी ताप नाय म्हणजे मौका भी है और दस्तूर भी…म्हणजे टॅंकरला काही तोटाच नव्हता…यात काही कमी पडू नये म्हणून या हाॅटेलवाल्यांनी माझ्यासाठी विशेष सोय केलीय हे मला दुसर्याच दिवशी समजलं…म्हणजे अस की माझ्या संध्याकाळी मस्त ग्लासवाॅलमधून बाहेर पाहत बसाव या विचारानं मी पडदा सारला तस अगदी हाकेच्या अंतरावर फक्त रस्ता ओलांडूनच पोचायच इतकी जवळ अशी ‘ गोरेगावची हिंदी स्मशानभुमी ‘ माझ्याच कडे बघत होती…बास झाल मग विषयच संपला त्या दिवशी रात्री कुठल्या तरी ग्रहावर मी एकटाच आहे…मी ओरडतोय पण कुणीच एैकत नाही उठून बसलोय तरी पण आवाज बाहेर पडत नाहीये असले खतरनाक भास व्हायला सुरूवात झाली.

म्हणजे यात रडायच मनल तर डोळ्याला पाणी येईना आणि बोंबलायच मनल तर नरड्यातून आवाजबी येईना असले हालत खराब… बास ही सगळी वेड्याची लक्षण आहेत हे मला आधीपासूनच माहित होत त्यामुळ त्या दिवसापासून मी त्याबाजूचे पडदे स्वतासाठी काढायच बंद करून जेवढे जेवढे तिकडे माझ्या आजू बाजूला होते त्या सगळ्यांना स्मशानभुमी दाखवायला सुरूवात केली आणि रात्री  झोपण्याचा कार्यक्रम बदलला…मी स्टेबल होतो आहे आणि यासाठी तुफान इंग्रजी पिक्चर बघणे, रात्री बेरात्री लोकांच्याच वरातीत नाचायची प्रॅक्टीस, गाढवडॅन्स करणे या व्यतिरिक्त कोरोना झालेला माणूस कसा दिसत असतोय असली फाल्तू उत्सूकता असणार्या माझ्या टुक्कार मित्रांचे फोन घेणे हे रात्रीचे उद्योग असत रात्री ३ वाजता मोठ्यानं गाणी लावत मनसोक्त नाचायचो आणि मग थंड पाण्यावर शाॅवर घेऊन ५-६ वाजता झोपायचो हा नित्यक्रम सुरू झाला आणि तो तसा अंगीही लागला…मी आजारी आहे किंवा कोरोना झालाय हे घरच्यांपर्यंत कधीच पोचू दिल नाही कदाचीत आजच्या या पोस्टनंतरच ते त्यांच्यापर्यंत पोचेल…२१ दिवसानंतर आज बाहेर पडलोय…७ व्याच दिवशी यातून संपुर्णपणे बरा झालो होतो मात्र तरीही टेक्निकली १४ दिवस घरात बसणं अपेक्षित होत…पुन्हा एकदा ठणठणीत होऊन बाहेर पडलोय.

या वर्षीच्या सुरूवातीलाच स्वतालाच शोधत शोधत एका सोलो ट्रिपवर गेलो होतो, परत येईपर्यंत प्रचंड खुश होतो बरच काही वेगळ करून आल्यानं. पण हा आनंद दोन दिवसातच मावळला होता पुन्हा जिथून गेलो होतो तिथेच परत आल्यासारख झाल होत. पण एकटा हा विचार जरी आला की धस्स व्हायच आणि सगळ काही बाजूला टाकत मी धावत रहायचो. पण या कोरोनाकाळानं विचार पुन्हा एकदा विचार करायची नव्यानं संधी दिली आणि आता  बस इतक्या दिवसात एकटं राहिल्यानं आणि तोच तोच विचार केल्यानंतर आता खरच एकट रहावस वाटतय…आजवर या बाबतीत विचार करताना गोंधळ व्हायचा आणि स्वभावातला हळवेपणा जिथ तिथ आडवाच यायचा…पण यावेळी कोरोना आला आणायच  माझ्यातला ‘हळवेपणा’ पुरता वजा करून आणि एकट राहिल्यान कोणीच त्रास देऊ शकत नाही हे नव्यान सांगून गेलाय….!!!

अत्यंत महत्वाच – मला विचारल तर माझ्यासाठी कोरोनापेक्षा फक्त सर्दी ही प्रचंड त्रासदायक आजार आहे कारण सर्दी झालेली कळते आणि कोरोना कळतही नाही कोव्हीड पाॅझिटीव्ह आल्यापासून ते आजवर कसलीही ट्रिटमेंट नाही, एकही औषधाची गोळी खाल्ली नाही किंवा कुठल इंजेक्शन नाही ना कुठे डाॅक्टरांकडे गेलो. बस टेस्ट पाॅझिटीव्ह आली आणि क्वारंनटाईन झालो. माझ्या स्वभावात नसतानाही २१ दिवस गप्प शांतपणे एकाच ठिकाणी बसून राहिलो. त्यामुळ जरी अस कोणाला काही झालच तर घाबरून जाऊ नका, शांत रहा आणि गप घरातच एकट एकट पडून रहा. 
हा एकमेव ईलाज, यापुढे अनेकदा कोरोना होईल आणि तो परत  नीट होईल,  All is well!


        – राहुल झोरी (मुंबई)

Related posts

कपाशी पीक जळाल्याने शंभर टक्के नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी…

nirbhid swarajya

मराठा पाटील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा…

nirbhid swarajya

शू्न्यातून विश्व निर्माण करणारे सतिषअप्पा दुडे

nirbhid swarajya
error: Content is protected !!