October 6, 2025
खामगाव चिखली

दुचाकी स्लिप होऊन १ ठार तर १ गंभिर

खामगांव : चिखली-खामगांव रोडवर मंगळवारी रात्री गणेशपूर जवळ मोटारसायकल स्लीप होऊन अपघात घडला होता यात एका इसमाचा मृत्यू तर सोबत असलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. या जखमी व्यक्तीवर अकोलाच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. देवानंद श्रीकृष्ण गवई वय (३५) रा. लोखंडा व दिनकर भास्कर हिवराळे वय (३७) वर्ष रा. लोखंडा हे दोघे मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान गणेशपूर येथे कामानिमित्त गेले होते, घराकडे परतत असतांना अचानक त्यांची मोटारसायकल स्लीप झाली व यामध्ये  देवानंद श्रीकृष्ण गवई यांचा मृत्यू झाला तर दिनकर भास्कर हिवराळे हे गंभीर जखमी झाले असल्याने उपरोक्त दोघांनाही प्रथम उपचारार्थ सामान्य रुग्णालय खामगाव येथे भरती करण्यात आले होते. परंतु दिनकर हिवराळे हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ अकोला येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

लॉजमध्ये विवाहित प्रेमीयुगलाची आत्महत्या…

nirbhid swarajya

मनोज जरांगे पाटील यांचा विदर्भ दौरा सोमवारी खामगावात जाहीर सभा…

nirbhid swarajya

३४ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!