April 19, 2025
अकोला आरोग्य खामगाव

अकोला जिल्ह्यापासून बुलडाणा जिल्ह्याला धोका

जिल्हावासीयांनी दक्ष राहण्याची गरज

खामगांव : बुलडाणा जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची प्रभावी व कठोर अंमलबजावणी मुळे सध्यातरी जिल्हा कोरोना मुक्ती च्या वाटेवर आहे.  मात्र, लगतचा अकोला जिल्हा  ‘रेड झोन’ मध्ये असल्याने बुलडाणा जिल्ह्याला कोरोना संक्रमणाचा चा धोका वाढला आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत १३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. अकोला जिल्ह्यापासून बुलडाणा जिल्ह्याची सीमा केवळ ५० किमी अंतरावर आहे. त्यामुळे खामगांव येथून अकोला जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्यांना सहज प्रवेश करता येतो.

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा जरी बंद करुन चेकपोस्ट तैनात केल्या आहेत. तरीही चोरट्या मार्गाने येणार्‍या, जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. शुल्लक कारणासाठी काही लोक अकोला जिल्ह्यात जात आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्ण कोरोनाबधित होते त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत २० कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याची वाटचाल ही कोरोना मुक्ती कडे झाली आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांत आणि मुख्य म्हणजे अकोला जिल्ह्यात विनाकामाने नागरिकांचे जाणे टाळले गेले पाहिजे त्यामुळे प्रशासनासोबतच जिल्हा वासीयांनी  देखील अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

Related posts

शॉक लागून ५५ वर्षीय इसमाचा मृत्यु

nirbhid swarajya

आठवडी बाजार नूतनीकरणाचे काम बंद करण्याची रहिवाशी व व्यावसायिकांची मागणी

nirbhid swarajya

लिकासन ट्रेडर्सचा परवाना रद्द

nirbhid swarajya
error: Content is protected !!