April 19, 2025
खामगाव

५०१ भोपळे सुकवुन तयार केले पाणीपात्र

श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंड़ळाचा सामाजिक उपक्रम

खामगांव : उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा पक्षांची पाण्यासाठी होणारी भटकंती रोखण्यासाठी नैसर्गिक रित्या बनवलेल्या कुंड़्याची निमिर्ती करण्याचा उपक्रम स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंड़ळाच्या वतिने राबविण्यात येत आहे. मागील २० वर्षा पासुन मंड़ळाचे वतिने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम १२ ही महिने निस्वार्थ पणे राबविण्यात येत आहे लाॅकड़ावून व सोशल ड़िस्टनसिंगच्या नियमाचे पालन करून  दि १४ एप्रिल पासुन आजपर्यंत दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत तलाव रोड़, शेगावरोड़, घाटपुरी  येथुन भोपळे आणुन त्याला सुकवुन दुपारी २ ते संध्या ६ पर्यंत कमंड़लुच्या आकाराचे कापुन तयार करण्यात आले. या कुंड़्या पर्यावरण पुरक व नैसर्गिक असल्याने पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी योग्य ठरत आहे. विशेष म्हणजे या कुंड़्याचे वाटप ही मंड़ळाच्या वतिने ज्या ठिकाणी पक्षांची संख्या असेल अश्या ठिकाणी आवर्जुन सोशल ड़िस्टनसिंगचे पुर्ण पालन करून वाटप करण्यात येत आहे.

Related posts

माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या प्रयत्नांना यश

nirbhid swarajya

पिक विमा भरण्यास अडचणी मुदत वाढवून देण्याची मागणी…

nirbhid swarajya

१ जानेवारी २०२१ शौर्य दिन सोहळा संपन्न

nirbhid swarajya
error: Content is protected !!