January 4, 2025
जिल्हा

शेती व बांधकाम साहित्याची दुकाने सकाळी ७ ते सायं ७ वाजेपर्यंत सुरू राहणार

कन्टेंटमेंट बाहेरील दुकानांना परवानगी

बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे राज्यात साथरोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात १७ मे २०२० पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात शेती संलग्न सर्व कामे व इतरही मान्सूनपुर्व कामे सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रतिबंधीत क्षेत्र अर्थात कन्टेटमेंट झोन बाहेरील शेती विषयक सर्व कृषि सेवा केंद्र, शेती विषयक इतर दुकाने, शेती विषयक साहित्य दुकाने तसेच हार्डवेअरचे सर्व दुकाने, वेल्डींग व ऑईलचे सर्व दुकाने, बांधकामासाठी सिमेंटची दुकाने व सिमेंटची रॅक उतरवणे / चढविणे, गोदामे, वाहन वाहतुक सुरू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सदर दुकाने सकाळी ७ ते सायं ७ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी आदेशान्वये दिली आहे.
या पूर्वीचे भाजीपाला, किराणा, बेकरी, दुध, इलेक्टी्रक, पेट्रोल पंप व प्लबींग दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत सुरू होती. ती त्याच वेळेत सुरू राहणार आहेत. त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सदर दुकाने त्याच वेळेत सुरू राहतील. शेती व बांधकाम साहित्याची दुकाने सोशल डिस्टसिंगचे पालन करतील. तसेच शेती विषयक बाबींसाठी कृषि विभागाने व बांधकामाकरीता संबंधित विभाग तसेच इन्सीडेंट कमांडर यांनी पासेस निर्गमीत कराव्यात. सदर पासेस पोलीस विभागामार्फत ग्राह्य धरण्यात याव्यात. सदर आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता च्या कलम १८८ नुसार दंडनिय कारवाईस पात्र राहणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

सौजन्य – जिमाका

Related posts

नानाजी देशमुख कृषिसंजिवनी योजनेत सहाय्यक यांच्याकडून हलगर्जीपणा

nirbhid swarajya

पाच वर्षाच्या ‘गुडीया’ ने दिली.. कोरोनाला मात..!

nirbhid swarajya

खामगाव सिलिंडरच्या ट्रकला धडक दिल्याने भरवस्तीत गॅस गळती…

nirbhid swarajya
error: Content is protected !!