April 19, 2025
खामगाव

अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरु ठेवल्याने दोघांविरुद्ध कारवाई

खामगांव : संचारबंदी काळात अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरू ठेवून त्या ठिकाणी गर्दी व सोशल डिस्टन्ससिंग चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दुकानांच्या संचालकांविरुद्ध नगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली. जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतरही खामगांव येथील बालाजी स्वीट चे संचालक तिलोक कृपालदास लखाणी, रा. सिंधी कॉलनी व सदगुरू मार्ट चे ओमप्रकाश गुरबाणी रा. सिंधी कॉलनी यांनी आपले दुकान अत्यावश्यक नसूनही उघडून त्या ठिकाणी गर्दी जमा करून सोशल डिस्टन्ससिंग चे उल्लंघन केल्याने नगरपालिकेच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली व त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला ही कारवाई नगरपालिका प्रथम क्रमांक तीन चे राजेश मुळीक यांच्या पथकातील सुभाष शेळके, संतोष तायडे, ज्योती कळंबे, दिनकर वानखडे व पथक क्रमांक चार मधील एस एम पुदाके यांच्या पथकातील हिवराळे नंदकिशोर पवार, सारिका ताई, सुनील तायडे यांनी केली.

Related posts

आदिवासी बांधवांना कपडे व फराळ वाटप करून दिवाळी साजरी

nirbhid swarajya

दोन ठिकाणी वीज चोरी पकडली

nirbhid swarajya

जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा आविष्कार…

nirbhid swarajya
error: Content is protected !!