खामगांव : कोरोनामुळे संपुर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळित झालेले आहे. पण काही गरीब, गरजू लोकांना शासन, सामाजिक संस्था यांच्या मार्फत जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जातायेत. मात्र एकीकडे पशुपक्ष्यांना अन्न पाणी भेटत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन बाबूजी गोल्ड चे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते सतीश राठी यांच्या कडून त्यांच्या कामगारांना पक्षांसाठी पाणी, अन्नासाठी मातिच्या भांडयाचे वाटप करण्यात आले.प.पू. राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सतीश राठी यांनी आज भैय्युजी महाराज आश्रम येथे जाऊन महाराज यांच्या समाधी वरती अभिषेक केला व त्यानंतर आपल्या फॅक्टरी मधील कामगारांना पक्षांसाठी पाणी, अन्नासाठी मातिच्या भांडयाचे वाटप केले.
सोबतच खामगांव औद्योगिक वसाहती मधील सर्व फैक्टरी मधे जाऊन हे पाण्याचे भांडे वितरीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आम्ही दरवर्षी प.पू. राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांच्या जयंतीदिनी गुरांना पाणी पिण्यासाठी हौद, पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे हे वितरीत करीत असतो यंदा कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती स्थिती लक्षात घेत सोशल सोशल डिस्टन्सिंग चे पालन करीत आज हा उपक्रम आम्ही राबवला असे सतीश राठी यांनी यावेळी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना सांगितले.