खामगांव : खामगांव येथील फरशी, सुटाळपुरा, घाटपुरी नाका, सत्यनारायण मंदिर, बोरी पुरा, छ. संभाजी राजे पुतळा आदी भागातील ज्या नागरिकांना रेशनचे धान्य भेटत नाही तसेच ज्यांचा सर्व प्रपंच हातावर आहे अशा लोकांना देवेंद्र दादा मित्र मंडळाच्या वतीने धान्य वाटप करण्यात येत आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देवेंद्र दादा मित्र मंडळाच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन सर्वे केला, तसेच ज्यांना खरच गरज आहे अशा नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये विधवा निराधार वृद्ध तसेच अत्यंत छोटे व्यवसायिक यांना प्राधान्य देऊन धान्य वाटप करण्यात आले आहे.
या धान्याचे वाटप अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले तसेच गोरगरिबांना मानसन्मान कोठेही दुखवल्या जाणार नाही याची काळजी सुध्दा घेण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील सुमारे तीनशे ते साडेतीनशे कुटुंबीयांना फार मोठा दिलासा मिळाला आहे तसेच काही वृद्धांना त्यांना लागणाऱ्या दोन महिन्यांच्या औषधांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन नगरसेवक देवेंद्र देशमुख, श्रीकृष्ण पाटील, वसंत पाटील, संजय कस्तुरे, सचिन पाठक, निलेश राऊत, वैभव अग्रवाल, बंडू मठपती, अविनाश वानखडे यांनी केले आहे.
previous post