पोलिसांनी टिप्पर सह मालक व चालकाला ताब्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरू
शेगांव : अवैध रेती वाहतूक करणार्या टिप्पर चा पाठलाग करून त्याला आढळणाऱ्या पोलिसाला टिप्पर चालकाने धडक देऊन पोलिसाला चिरडल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी टिप्पर चालकास सह मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे असून गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरू आहे टिप्पर पोलिसांनी जप्त केले आहे
सर्वत्र लॉकडाऊन ची स्थिती असतानाही बुलडाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आलेले आहे. यामध्ये पूर्णा नदी ला असलेल्या गावांजवळ अवैध रेती वाहतूक करणारे वाहने रात्रभर रेतीची वाहतूक करीत आहेत. यामध्ये बुधवारी पहाटे शेगाव तालुक्यातील माटरगाव, भास्तन गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावर तून एक विना नंबर चे टिप्पर रेती घेऊन खामगाव शहरकडे जात असल्याची माहिती जलंब पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल उमेश शीरसाट यांना मिळाल्यावरून त्यांनी एका होमगार्डला सोबत घेऊन मोटरसायकलने भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्पर चा पाठलाग केला सदर टिप्पर हा माटरगाव या गावाच्या पुढे पोचलेला असताना पोलिसाने त्याला थांबविण्यासाठी प्रयत्न केला असता टिप्पर चालकाने टिप्पर थांबविले नाही दरम्यान टिप्पर चालकाने आपले वाहन थेट पोलीस कॉन्स्टेबल उमेश शीरसाट यांच्या अंगावरून पुढे नेले. घटना घडताच सोबत आलेला होमगार्ड यानंतर टिप्पर चालकाने टिप्पर सह घटनास्थळा वरून पोवारा केला.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनासथळावर पोहचले असून सकाळपासून सदर वाहनाचा शोध सुरु होता अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलिसांनी टिप्पर क्रमांक एमेच २८ बीबी -४९२३ ला मालकाला व टिप्पर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरू आहे.
