बुलडाणा : जिल्ह्यात एकूण २४ रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे. त्यापैकी १७ रूग्णांचे कोरोनासाठी दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या १७ झाली असून सध्या रूग्णालयात ६ रूग्ण उपचार घेत आहेत. रूग्णालयात सध्या ६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत . तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने १९ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ६ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ३५७ आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
