November 20, 2025
बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू दुकानांमध्ये झडती सत्र

दारू साठयामध्ये तफावत ; जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार अहवाल

खामगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने खामगावात दारू दुकाने व वाईन बार मधील लॉकडाऊन दरम्यान तसेच दुकान सील केल्यानंतर असलेल्या साठ्यात तफावत आहे का? या संदर्भात कालपासून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. चौधरी यांच्या वाईन शॉप वर काल संध्याकाळी पथक दाखल झाले यावेळी चौधरी यांच्या दुकानाची रात्री १२ वाजेपर्यंत तपासणी केल्यानंतर रिकॉर्ड मधील नोंदी पेक्षा देशी विदेशी दारूच साठा कमी आढळल्याने अहवाल तयार करण्यात आला आहे. अंतर्गत त्रुटी आढळल्याने चौधरी यांच्याविरुद्ध विभागीय प्रकरणाची नोंद करून संबंधित अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन दरम्यान दारूची खामगाव व परिसरात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

चौधरी यांच्या दुकानात कमी आढळलेला साठा

रेकॉर्ड प्रमाणे चौधरी यांच्या वाइन शॉप मध्ये देशी दारू ७५० मिली १३५ नग १८० मिली ३६३२ नग ९० मिली १५९४ नग विदेशी दारू- २ लिटर १० नग १ लीटर ६५ नग ७५० मिली ८७ नग ३७५ मिली ६९० नग १८० मिली ३३८१ नग ९० मिली ३२८० नग ६० मिली २५ नग बिअर ६५० मिली ८८२ नग ५०० मिली ६९ नग ३३० मिली ३२ नग असा दारू साठा कमी आढळला आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

यासोबतच एमआयडीसी येथील पवन वाईन बार होटेल गौरव वाईन बार, शेगाव रोडवरील हॉटेल पॅरेडाइज् वाईन बार आदी ठिकाणी जाऊन दुकानातील मालाची तपासणी केली. या पथकात निरीक्षक शेवाळे, दुय्यम निरीक्षक बर्डे, दुय्यम निरीक्षक आढळकर, दुय्यम निरीक्षक मुंगळे,निरीक्षक गावंडे ,निरीक्षक नरेंद्र मावळे, चव्हाण यांनी सहभाग घेतला.

Related posts

श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना च्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस….

nirbhid swarajya

जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैध धंदे बंदचा फतवा

nirbhid swarajya

शेगावात २८ मार्च ला ओबीसींचा सामाजिक महामेळावा !

nirbhid swarajya
error: Content is protected !!