April 19, 2025
जिल्हा बुलडाणा

पाणी टंचाई निवारणार्थ ३० विंधन विहीरी मंजूर

२६ गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी घेणार विहीरी


बुलडाणा : पाणीटंचाई निवारणार्थ  सिंदखेड राजा व बुलडाणा तालुक्यातील एकूण २६ गावांमध्ये विंधन विहीरी घेण्यास मंजूरात देण्यात येत आहे. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.
   सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बु, चांगेफळ, साठेगांव, बोराखेडी गंडे, पिंपरखेड बु, केशवशिवणी, वाकद जहाँगीर, खैरव, पिंपळगांव सोनारा, गुंज, दरेगांव, महारखेड,  राजेगांव, सायाळा, पांग्री काटे, मलकापूर पांग्रा या गावांसाठी एक विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे, तर  शेंदुर्जन,  साखरखेर्डा गावांसाठी दोन विंधन विहीरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बुलडाणा तालुक्यातील शिरपूर, पांगरी, भडगांव, चिखला, नागझरी खु, आमसरी या गावांसाठी एक विंधन विहीर आणि रायपूर गावासाठी २ विंधन विहीरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.


सौजन्य : जिमाका

Related posts

जिल्ह्यात प्राप्त 16 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 15 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

लग्नात पाळी आलेली सांगितली नाही म्हणून नववधूला घटस्फोट

nirbhid swarajya

अण्णा भाऊ साठे नगर म्हाडा कॉलनीत घाणीचे साम्राज्य

nirbhid swarajya
error: Content is protected !!