November 20, 2025
जिल्हा बुलडाणा शेतकरी

शेतकऱ्यांना शेतमाल कुठेही नेऊन विकता येईल – गृहमंत्री अनिल देशमुख

बुलडाणा : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील शेतमाल वाहतूक करण्यासाठी कुठलीही मनाई नाही त्यानी बिनधास्त पणे आपल्या शेतातील भाजीपाला, फळे, धान्य इतर शेतमाल शहर, जिल्ह्या व जिल्ह्याबाहेर नेता येईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यानी बुलडाणा येथे दिली ,
तसेच सोशल मिडियावर जर कोणी समाजात तेढ निर्माण करणारे मैसेजेस पोस्ट करीत असतील अश्यावर कड़क कार्रवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत , अश्यांची गय केली जाणार नाही असेही गृहमंत्री यानी बुलडाणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषद मद्धे सांगितले ते बुलडाणा जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आले असता बैठकी नंतर पत्रकारांशी बोलत होते.

कोरोना संसर्गाबाबत हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील एकंदरीत स्थितीचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतलाय. त्यानुषंगाने बुलडाणा पालकमंत्री , खासदार , आमदार यासह जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकार्यासमवेत त्यांनी चर्चा केलीय.

Related posts

वीज पडून एकाचा मृत्यु तर; एक जण गंभीर जखमी

nirbhid swarajya

लॉकडाऊन मधे २० नागरिकांची वरखेड येथून सुटका

nirbhid swarajya

आ.अँड.आकाश फुंडकर यांचे वाढदिवसानिमित्त युवकांनी केले रक्तदान

nirbhid swarajya
error: Content is protected !!