खामगाव : संपुर्ण देशामधे लॉकडाऊन सुरु आहे. सर्व ठिकाणी पोलिसाचा बंदोबस्त लागला असुन कुठलेही वाहन रस्त्यावर फिरताना दिसत नाही आहे, अश्यातच अवैधरित्या रेती घेऊन जाणारे टिप्पर पोलिसानी पकडले आहे. खामगांव शहर पोलीस स्टेशन चे पी एस आय गौरव सराग हे काल रात्री पेट्रोलिंग करत असताना येथील विकमसी चौकातुन MH-04-AF-6499 हे टिप्पर रेती घेऊन जाताना दिसले.यावेळी पोलिसानी सदर टिप्पर ची पाहणी केली असता त्यांना मधे त्यांना दीड ब्रास रेती मिळून आली. सदर टिप्पर चालकाची चौकशी केली असता चालकाकडे कुठलीही रेती संबंधित कागदपत्रे न आढळयाने हे टिप्पर पोलिसांनी जप्त करुन शहर पोलीस स्टेशन मधे लावले आहे.पुढील कार्यवाही साठी तहसील कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे.लॉकडाऊन सुरु असताना अवैधरित्या रेती उत्खणन व वाहतुक सुरु असल्याचे चित्र यावरून दिसुन येत आहे.