November 20, 2025
बातम्या

खामगाव मध्ये घरासमोर नवीन कपडे आणि पैसे टाकून जात असल्याचा प्रकार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


खामगाव : कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वच जण घरात बसलेले आहेत अशावेळी खामगाव शहरातील काही भागांमध्ये अज्ञात व्यक्तींकडून घरासमोर नवीन कपडे आणि पैसे टाकल्या जात असल्याने या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना ने संसर्ग करून पैसे आणि कपडे टाकल्या तर जात नाही ना ? अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे.
खामगाव शहरातील  झुलेलाल नगर, सिद्धी कॉलोनी आणि  परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे नवीन कपडे आणि पैसे टाकणारे व्यक्ती काही ठिकाणी सीसीटीवी मध्ये कैद झालेले आहेत. मात्र सदरील व्यक्ती हे अनोळखी असल्याने त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.  मात्र दुसरीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनोळखी व्यक्तींकडून परिसरात कोरोना विषाणूची लागण लावून देण्यासाठी तर हा प्रकार केले जात नाही ना अशी शंका तेथील रहिवासी नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे अशी माहिती मुरली नेभवानी यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना दिली आहे.

Related posts

Google Home One-ups Amazon Echo, Now Lets You Call phones

admin

जिल्हयात आज प्राप्त १६ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

nirbhid swarajya

उध्दवजी ठाकरे यांच्या सत्काराचे काँग्रेसच्या वतीने आयोजन

nirbhid swarajya
error: Content is protected !!