बुलडाणा : कुठलाही साथीचा आजार आल्यास रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या कुपोषित बालकांना हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील ३१० कुपोषित बालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या ही ३१० आहे, मागील वर्षी पेक्षा यामध्ये १४२ बालकाची वाढ झाली आहे, ह्या बालकांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने कोरोना विषाणूचा शिरकाव होण्याची शक्यता अधिक असू शकते त्यामुळे ह्या बालकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. ह्या सर्व बालकांना अंगणवाडी च्या माध्यमातून घरपोच पोषण आहाराचे वाटप करण्यात आले असून त्यांची नियमित तपासणी देखील करण्यात येत आहे.
previous post