January 7, 2025
जिल्हा

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून झाला नोंदणी विवाह

जळगाव जामोद : बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील चांगेफळ खुर्द येथील सरला अवचार आणि आणि खेर्डा गावातील प्रशांत दामोधर यांचा विवाह महिन्याभरापूर्वी ठरला होता.  काल १४ एप्रिल ला त्यांच्या विवाहाची तारीख होती, मात्र कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशामध्ये संचारबंदी आणि लोकडाऊन असल्याने कोणतंही गाजावाजा आणि खर्च न करता या दोघांचा विवाह चांगेफळ येथील ग्रामपंचायत मध्ये अगदी २ साक्षीदार लोकांसमोर नोंदणी करत संपन्न झालाय. यावेळी नवरदेव नवरीने सेनिटायझर आणि सोशल डीस्टंसिंग चे पालन करत तोंडाला मास्क हि लावलेले होते. तर सोबत असलेले ग्रामपंचायत चे अधिकाऱ्यांनी सुद्धा मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पालन करत सरला आणि प्रशांत चा नोंदणी विवाह लावून दिल्याचे प्रमाणपत्र हि दिलेय आणि दोघांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिलाय. यावेळी वर – वधू सह ग्रामपंचायत सचिव उपस्थित होते.  तर या वर -वधूला चांगेफळ ग्रामपंचायत कडून एक हजारांचे प्रोत्साहन पार बक्षिस हि देण्यात आलेय. अशा आगळ्यावेगळ्या विवाहाचे सर्वत्र कौतुक होतेय.

Related posts

अतीरुष्टि मुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे शेतकऱ्यांच्या बाधावर जाऊन पंचनामे करा स्वाभिमीनीची मागणी.

nirbhid swarajya

शिवाजी नगर पोलिसांनी दारूची अवैध वाहतूक करणारी कार पडकली…

nirbhid swarajya

मँट्याडोर व दुचाकीच्या धड़केत १ ठार; १ जण जखमी

nirbhid swarajya
error: Content is protected !!