November 20, 2025
जिल्हा बुलडाणा

मलकापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड हरीश रावळ यांच्या विरोधात कारवाई करणार – जिल्हाधिकारी

बुलडाणा : कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये क्वारंटाईन केलेले मलकापूर चे नगराध्यक्ष अ‍ॅड हरीश रावळ यांनी रुग्णालयामधील असुविधांचा व्हिडिओ तयार करून वायरल करणे आता महागात पडणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्या जात असल्याची माहिती दिली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात कोरूना बाधितांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. यामध्ये मलकापूर येथील एका चा समावेश आहे. हा रुग्ण मलकापूर चे नगराध्यक्ष अ‍ॅड हरीश रावळ यांच्या संपर्कात आल्याने अ‍ॅड हरीश रावळ हे स्वतः बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये क्वारंटाईन झाले आहेत मागील तीन दिवसांपासून ते रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना त्यांनी रुग्णालयांमधील असुविधांचा एक व्हिडिओ तयार करून व्हायरल केला होता ज्यामध्ये  रुग्णालय प्रशासनावर असे अनेक आरोप करीत रुग्ण पळून जात असल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले होते. या व्हिडिओने प्रशासनामध्ये एकच खळबळ उडून दिल्यानंतर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी याची गंभीरतेने दखल घेत नगराध्यक्ष अ‍ॅड हरीश रावळ यांच्याविरोधात कारवाई करीत असल्याचे सांगितले आहे.

Related posts

भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

nirbhid swarajya

कोरोनाच्या भीतिने 3 महिन्यापासुन आजोबा शेतातील मंचनावर

nirbhid swarajya

नगरपरिषद खामगाव इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट फक्त नावालाच का?…

nirbhid swarajya
error: Content is protected !!