January 6, 2025
बुलडाणा महाराष्ट्र शेतकरी

तूर, हरभरा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

नाफेड तूर – हरभरा, कापुसपणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरू होणार

बुलडाणा/मुंबई : पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सदर लॉकडाउन च्या कालावधीत नाफेड तूर हरभरा खरेदी केंद्र तसेच कापूसपणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे, शेतकऱ्यांचा शेतमाल पडून राहत असल्यामुळे ही खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सदर मागणीच्या अनुषंगाने आज १३ एप्रिल  रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी चर्चा केली  व तूर, हरभरा व कापूस यांची खरेदी प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली. त्यानुसार मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तूर हरभरा व कापूस खरेदी प्रक्रिया दिनांक १५ एप्रिल २०२० पासून सुरू करण्याचे निर्देश दिले. यानुसार हरभरा व कापूस या शेतमालाच्या खरेदीची प्रक्रिया दिनांक १५ एप्रिल २०२० पासून सुरू करण्यात येणार आहे. सदर चर्चेच्या वेळी डॉ. राजेंद्र शिंगणे,अजय मोहता मुख्य सचिव, मनोज सैनिक अप्पर मुख्य सचिव (वित्त) व अनुपकुमार सचिव ( पणन) आदी  उपस्थित होते.

Related posts

जिजाऊ स्कुल आँफ स्कालर्स मधे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज देणार ४५००० हजार

nirbhid swarajya

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

nirbhid swarajya

दोन ऑटो चालकांमधे शुल्लक कारणावरून वाद ; एकाचा खून

nirbhid swarajya
error: Content is protected !!