November 20, 2025
जिल्हा बुलडाणा

बुलडाणा मध्ये २७ क्विंटल जास्त गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाही

बुलडाणा : बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २७ क्विंटल गांजा जप्त केला आहे, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला आहे, ज्यामध्ये ९७ लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय यामध्ये दोन आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
बुलडाणा शहर लगत असलेल्या येळगाव शिवारातील गौतम नगर परिसरातील एका घरात गांजा साठवलेला असल्याची गोपनीय माहिती च्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता घरामध्ये ९४ लाख रुपयांचा २७ क्विंटल गांजा पोलिसांनी जप्त केला आहे , यामध्ये मोताळा तालुक्यातील कुऱ्हा गोतमारा येथील मनोज झाडे आणि गजानन मंजा या दोघांना अटक केली आहे, तर यामध्ये अजूनही आरोपी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 220 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 39 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

रागाच्या भरात मनोरुग्न मुलाकडून वडिलांचा खून

nirbhid swarajya

अल्हाज असद बाबा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मरणोपरांत पद्मभूषण सम्मान द्यावा

nirbhid swarajya
error: Content is protected !!