April 19, 2025
जिल्हा महाराष्ट्र

संकटकाळात वंचित बहुजन आघाडी गरिबांच्या मदतीला

खामगाव : कोरोनाचे संकट जिल्ह्यात थैमान घालत असल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर अनेक गरिबांना, निराधारांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अशा या प्रतिकूल परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी यांच्या मदतीला पुढे सरसावली आहे.
आज महाराष्ट्र भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तसेच वंचीत बहुजन आघाडीचे संसदीय सदस्य मा. अशोक सोनोने यांच्या तर्फे गरजू व निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामध्ये गहू, तांदूळ, मीठ, तेल अश्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
उपेक्षितांच्या मुखी दोन घास पडावेत, त्यांचेही जगणे सुलभ व्हावे, या सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून खामगाव येथे केलेले  जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे कार्य आहे. बाजार समिती संचालक राजेश हेलोडे, नगरसेवक विजय वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप करण्यात आले. यावेळी संतोष जाधव, निलेश गवई, सुजित इंगळे,महेश इंगळे, गौरव सावंग, लखन सावंग, नवल वाकोडे, सचिन वाकोडे, लखन हेलोडे, सुमित हेलोडे आदी उपस्थित होते.

Related posts

गुंजकर कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल

nirbhid swarajya

राज्याचे मंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या सोबत पत्रकारांची चर्चा

nirbhid swarajya

महामार्गाच्या दुतर्फा नालीवरील अतिक्रमण जैसे थे ! बेशिस्त वाहनधारकांची भर ; वाहतूकीस अडथळा…

nirbhid swarajya
error: Content is protected !!