January 6, 2025
जिल्हा

लॉकडाऊन मध्ये ‘ते’ देतायेत मोफत रुग्णवाहिका सेवा

शेगाव : कोरोनामुळे राज्यात पंधरा दिवसांपासून लॉकडाऊन झालेले असतानाच अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणतीही सेवा सुरू नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे डायलिसीस, कॅन्सर, ह्रिदयरोग तसेच ज्यांना सतत रक्त चढवावे लागते, अशा रुग्णांचे सर्वाधिक हाल होत असून त्यांची जास्त गैरसोय झाली आहे. ज्यांना नित्याने उपचारासाठी रुग्णालयात जावे लागते अशांना वाहनसेवाच नसल्याने “माझे मरण पाहिले मी” अशी त्यांची स्थिती झाली आहे. रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन शेगाव शहरातील युवक्रांती संघटना दूत बनून आली आहे. युवक्रांती संघटने कडून रुग्णासाठी विनामुल्य अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा आपत्कालीन रूग्णाकरिता शेगाव शहर तसेच शेगाव ते खामगांव या कार्यक्षेत्रात विनामुल्य चालविण्यात येत आहे  आतापर्यंत त्यांनी असंख्य रुग्णांना फ्री अॅम्ब्युलन्स
अत्यावश्यक सेवा विनामूल्य सुरू केली.  त्यामुळे एका अर्थाने युवाक्रांती संघटनेने केलेली फ्री अॅम्ब्युलन्स सेवा देवदूत बनून आल्याची भावना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. देशभरात संकट आलेले असतानाच आपल्याकडून मातृभूमीची सेवा कशी होईल या हेतूने संघनेचे संचालक विजय यादव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सेवा करण्याचा संकल्प सिद्धीस आला. आता विनामूल्य सेवा देतांना कोणाकडून काही मागायचे नाही व देशाप्रति काहीतरी देणे द्यायचे म्हणून यामाध्यमातून अत्यावश्यक म्हणून अविरत रुग्णसेवा देऊ केली आहे विजय यादव यांची समाजकार्यात चांगली पकड असून नव्याने शहरवासीयांच्या सेवेत मोफत रुग्णसेवा देण्याचा संकल्प त्यांनी करून दाखवला आहे आधीच व्यवसाय नसल्याने घरात पैसा नाही, कुटुंबीय देखील त्यामुळे हैराण आहेत. पण तरीही ते संकल्पावर ते ठाम होते. त्यांची सेवा देण्याची तळमळ बघून त्यांच्या सहकार्याचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. अंबुलन्स सेवेकरिता संपर्क
अमित जाधव मो.नं 9822227111
विजय यादव मो.नं. 8208242727 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
रुग्णांची 24 तास विनामूल्य सेवा हे व्रत स्वीकारून समाजसेवा करण्याचे काम शहरातील युवाक्रांती संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे मोफत रुग्णवाहिका या उपक्रमातून जनसेवा ही ईश्वरसेवा हा संदेश संघटनेच्या कार्यातून मिळत आहे.
सामान्य लोकांना अनेकदा आर्थिक कारणामुळे  उपचारासाठी रुग्णालयात जाणे शक्य होत नाही. महागाईच्या काळात हॉस्पिटल मधील सेवाही अनेकांना परवडत नाहीत. या उद्देेशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे असे मत युवाक्रांती संघटनेचे विजय यादव यांनी निर्भिड स्वराज्य शी बोलतांना व्यक्त केले.

Related posts

देहव्यापार करताना दोघांना अटक ; गुन्हा दाखल

nirbhid swarajya

बलात्कार करून फरार आरोपी 37 वर्षानंतर पकडला

nirbhid swarajya

रस्त्यांवर विनाकारण फिरणार्‍यांसाठी प्रशासनाची अनोखी शक्कल

nirbhid swarajya
error: Content is protected !!