January 4, 2025
बातम्या

लॉकडाऊन मध्ये पोलीसांचा जुगारा वर छापा

खामगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. मात्र लॉकडाऊन च्या काळात अनेक ठिकाणी गल्ली बोळ्यात जुगार खेळल्या जात आहे. शहरानजीक असलेल्या सजनपुरी भागात पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका बंद घरात पैशाच्या हारजीतीवर जुगारावर छापा टाकून तिघांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील सजनपुरी भागात शिवाजी नगर पोलिसांना एका बंद खोलीत जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घरावर छापा टाकला असता तेथे तुराबशहा सरदार शहा (५१) यांचे राहते घरात त्याच्यासह रियाज खान हबीब खान ३७,शेख आवेश शेख नजीर ३० हे तिघे काल दुपारच्या सुमारास पैश्याचे हारजीतवर ताश पत्यावर एक्का बादशहा नावाचा जुगार खेळतांना त्यांना रंगेहात पकडुन त्यांचे जवळून ताशपत्या सह १७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व त्यांना ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून उपरोक्त तिघां विरुद्ध म. जु. का .कलम ४.५ महा.जुगार अधिनियम सहकलम १८८,२६० नुसार गुन्हा दाखल केला. काहीदिवसांआधी शहर पोलिसांनी सुद्धा एका जुगारावर छापा टाकून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related posts

लॉजमध्ये विवाहित प्रेमीयुगलाची आत्महत्या…

nirbhid swarajya

आग विझवितांना शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

nirbhid swarajya

सैनिक बांधवांसाठी मोफत प्रॉपर्टी सेवा

nirbhid swarajya
error: Content is protected !!