April 18, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

आज प्राप्त रिपोर्टमध्ये ३० निगेटीव्ह, तर २ पॉझीटीव्ह

अलगीकरणातून १२ नागरिकांना सोडले

बुलडाणा : जिल्ह्यातील ३४ संशयीत व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.  प्रयोगशाळेतून आज ३२ नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यामध्ये दोन पॉझीटीव्ह व ३० नमुने निगेटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह मध्ये एक व्यक्ती सिंदखेड राजा व दुसरी व्यक्ती शेगांव येथील आहे, अशी माहिती प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली आहे.     
     काल दि. ६ एप्रिल २०२० पर्यंत ९६ भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातील  नागरिकांची आज मुक्तता करण्यात आलेली नाही. नवीन नागरिक गृह विलगीकरणात आज दाखल नसल्यामुळे  ‘होम क्वारंटाईन’च्या संख्येत वाढ झालेली नाही. तसेच जिल्ह्यात  संस्थात्मक विलगिकरणात आज ८६ व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणात आज ०८ नागरिकांची भर पडली आहे. यामधून आज मुक्तता करण्यात आली नाही.  संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण ८६ नागरिक आहेत.

 जिल्ह्यात आज खामगांव आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात ३ व शेगांव येथे १ संशयीताला दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे ४ संशयीतांना दाखल करून त्यांचे स्वॅब नमुने  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या १४ व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव ५, शेगांव १ व बुलडाणा ८ व्यक्तींचा समावेश आहे.  घरीच स्वतंत्र खोलीत १४ दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत ५७ नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत ९५ नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. अलगीकरणातून १२ नागरिकांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत ३० व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील १४ , शेगांव ५ व खामगांव येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे.
  आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण १२६ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज १२ नमुने पाठविण्यात आले आहे. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी ११२ नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ११ पॉझीटीव्ह व  १०१  निगेटीव्ह रिपोर्ट  आले आहेत. तसेच एक मृत्यू झाला आहे.   तसेच १४ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.

सौजन्य – DIOBULDANA

Related posts

नगरपरिषद खामगाव इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट फक्त नावालाच का?…

nirbhid swarajya

विद्यार्थिनीने मिळवले १०० पैकी १०० गुण

nirbhid swarajya

खामगाव: पोलीस ‘दादा’चे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’! तीन गाड्यांना दिली धडक,वाहनांचे लाखोंचे नुकसान…

nirbhid swarajya
error: Content is protected !!