January 1, 2025
बातम्या बुलडाणा

अंधश्रध्दा रूढी, परंपरांना मूठमाती देत समाजापुढे निर्माण केला नवा आदर्श

जळगाव जामोद : माणसाची विचार करण्याची प्रवृत्ती ज्या ठिकाणी संपते, त्या वेळेस या अनिष्ट रूढी  परंपरा आणि अंधश्रद्धा निर्माण होतात. साधु-संतांच्या, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले,आंबेडकर यांच्या या भूमीत काही लोकांमुळे अंधश्रद्धेचं व कालबाह्य झालेल्या परंपरांचं बीज रोवलं गेलं आहे. स्वत:ला पुढारलेले, प्रगत म्हणवणारे आपण अजूनही रूढी, प्रथा-परंपरा यांचं डोळे झाकून पालन करतो. मात्र काही लोक असेही आहेत ज्यांच्यामुळे आजही समाजाचा समतोल बिघडलेला नाही. मराठा सेवा संघ विचार धारेचा वसा घेतलेले भिमराव रामराव ढोण पाटील ज्यांनी समाजातील अश्याच अनिष्ट रूढी, परंपरांना फाटा देत आपल्या नवीन घरात प्रवेश करत असताना नव्यानी कल्पक मुलींना महत्व देणारी, वास्तुशांती पुजनाला व पुरुषप्रधान संस्कृतीला मुठमाती देऊन आपल्या नवीन घराची ग्रुहप्रवेश पुजा केली.

भीमराव सरस्वती रामराव ढोण पाटील हे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या गावचे आहेत. इतरांप्रमाणे आपले स्वतःचे नवीन घर असावे असे स्वप्न पाहून, अपार कष्ट करून त्यांनी स्वतःचे नवीन घर त्यांनी बांधले. कुटुंबासोबत नवीन घरात राहायला जायचा त्यांना आनंद ही मात्र इतरांप्रमाने वास्तुशांती पूजन करून थाटामाटात कार्यक्रम न करता त्यांनी रामनवमी च्या निमित्ताने आपल्या घराच्या गृहप्रवेश कार्यक्रमामध्ये सकाळी आपल्या मुलीचे त्यांच्या हाताने कोपरामध्ये पाण्याने पाय धुवून व कुंकवा मध्ये तिचे पाय ठेवून घरामध्ये तिचे पावले उमटवले आणि औक्षण करून तिचे पुजण केले व त्यांचे ग्राम देवता, कुल देवता साविञि-जिजाऊंचे नामस्मरण करुन, सावित्री जिजाऊ वंदना म्हणून तसेच आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन त्याच्या घराच्या गृहप्रवेशाचा अनोखा सोहळा घरगुती आनंदी वातावरणात घडवून आणला.

भीमराव ढोण यांनी निर्भिड स्वराज्य शी बोलतांना सांगितले की “माझा सुरुवाती पासूनच अंधश्रध्दा, रूढी परंपरांना विरोध आहे. मुलगा जन्माला आला की लोकांना आनंद होतो आणि ते पेढे वाटतात मात्र मुलगी जन्माला आली की लोक जिलेबी वाटतात पण मला जेंव्हा कन्या रत्न प्राप्त झाले तेंव्हा मी जिलेबी न वाटता पेढे वाटले होते व मुलाप्रमाणे मी माझ्या मुलीचा सांभाळ करतो आहे.”आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही लोकांच्या मनावर मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा पगडा आहे. असंच असेल तर शिकून फायदा काय? म्हणून या सर्व अंधश्रद्धांना, कर्मकांडांना तिलांजली द्यायला हवी. त्यासाठी सर्वप्रथम लोकांनी आपली  मानसिकता बदलणं गरजेचं आहे. भीमराव  ढोण यांनी मराठा सेवा संघाच्या विचारधारेने समाजा मधे आज ही चालत असलेल्या अनिष्ठ रुढी, परंपरा यांना हुडकावून लावत मुलींना महत्त्व देणारा, स्त्री पुरुष समानतेचा नवा पायंडा समाजापुढे आदर्श म्हणून निर्माण केला आहे.

Related posts

पशुवैद्यकीय दवाखाना बनला दारुड्यांचा अड्डा

nirbhid swarajya

जलकुंभ परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण

nirbhid swarajya

खामगांव पँथर स्टूडेंट फेडरेशन शहर अध्यक्षपदी अजय सारसर खामगाव शहर कार्यकारणी गठीत…

nirbhid swarajya
error: Content is protected !!