January 4, 2025
जिल्हा बुलडाणा

रुग्णाला उपचारासाठी डॉक्टरांनी भरती न केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू

बुलडाणा : लॉकडाऊनच्या काळात बुलडाण्यातील सोळंके ले आऊट येथील ७० वर्षीय रुग्णाला ह्रदयविकाराचा झटका आला असता त्यांना उपचारासाठी डॉ.दिपक लद्दड व डॉ कोथळकर यांनी नकार दिल्याने रुग्ण गुरुवारी २ एप्रिलला दगवल्याचा आरोप करीत मृतकाच्या मुलगा इसरार अहेमद यांनी करून आज शुक्रवारी ३ एप्रिलला शहर पोलिसात डॉ.लद्दड आणि डॉ.कोथळकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

सोळंके ले आउट येथील रहवासी ७० वर्षीय मेहेदी हसन अन्सारी यांच्या पोटात आणि छातीत दुखत असल्याने त्यांना २ एप्रिल रोजी २.३० ते २.४५ वाजता डॉ.दिपक लद्दड यांच्याकडे नेले असता त्यांनी त्यांना तपासणी केले आणि भरती करून घेण्यास नकार दिले व शासकीय रुग्णालयात नेण्याचे सांगितले रुग्ण मेहेदी हसन यांनी स्वतः डॉ.लद्दड यांनी उपचरासाठी भरती करण्यासाठी विनंती करूनही त्यांना भरती करण्यात आले नाही. यानंतर ज्या डॉ.कोथळकर कडे गेल्या चार महिन्यापासून त्यांचा ह्रदय विकाराचे आजारपणाचा उपचार सुरू होता त्याच्या हॉस्पिटल स्टाफकडून ही डॉक्टर सुट्टीवर सांगण्यात आलं. दरम्यान त्यांना शासकीय रुग्णालयात नेत असतांना मेहेदी हसन अन्सारी यांचा मृत्यू झाला असा आरोप करीत बुलडाणा शहर पोलिसात मृतकाच्या मुलगा इसरार अहेमद यांनी तक्रार दाखल करून डॉ.लद्दड आणि डॉ.कोथळकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

Related posts

शेतकरी दांपत्यावर विज पडून पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी

nirbhid swarajya

लग्नात पाळी आलेली सांगितली नाही म्हणून नववधूला घटस्फोट

nirbhid swarajya

त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा-पत्रकारांची मागणी पत्रकार दिनीच पत्रकारांचे निवेदन

admin
error: Content is protected !!