November 21, 2025
आरोग्य बातम्या बुलडाणा

जिल्ह्यात ‘होम क्वारंटाईन’मधील १४ नागरिकांची मुक्तता


गृह विलगीकरणात आता ५० नागरिक

बुलडाणा, दि. 28 :  जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. पुणे, मुंबई येथून आलेल्या नागरिकांनादेखील क्वारंटाईन करण्यात येत आहे. हातावर शिक्का मारलेल्या व्यक्तीने 14 दिवस घरातील खोलीत निरीक्षणाखाली रहावे. जिल्ह्यात आज  ‘होम क्वारंटाईन’ अर्थात गृह विलगीकरण मधील 14 दिवस पूर्ण केलेल्या 14 नागरिकांची मुक्तता करण्यात आली.घरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या  नागरिकांमध्ये आज 3 नागरिकांची भर पडली आहे. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज वाढ झाली. मात्र गृह विलगीकरणमधील 14 नागरिकांची मुक्तता करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात आज विलगीकरण केलेल्या तीन नागरिकांसह ही संख्या 50 झाली आहे.

काल दि. 27 मार्च 2020 पर्यंत  61 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 28 मार्च 2020 रोजी तीन नवीन नागरिक निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मात्र घरीच 14 दिवसांचे निरीक्षण पूर्ण केलेल्या 14 नागरिकांची निरीक्षणातून सुटका करण्यात आली.  अशाप्रकारे 14 वगळता जिल्ह्यात एकूण 50 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे दोन व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.       जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात तीन नागरिकांना संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अजून रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात विदेशातून आलेल्या नागरिकांची निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 19 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 02 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.


सौजन्य DIO buldana

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 294 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 52 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

क्रेशर मशीन ची टॉगल प्लेट लंपास; गुन्हा दाखल

nirbhid swarajya

कोरोना निर्मुलनासाठी ‘अपाम’च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

nirbhid swarajya
error: Content is protected !!