November 20, 2025
आरोग्य बातम्या बुलडाणा

जिल्ह्यातील चार संशयित नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

गृह निरीक्षणामधील नागरिकांमध्ये आज वाढ नाही

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. पुणे, मुंबई येथून आलेल्या नागरिकांनादेखील क्वारंटाईन करण्यात येत आहे. हातावर शिक्का मारलेल्या व्यक्तीने 14 दिवस घरातील खोलीत निरीक्षणाखाली रहावे. बुलडाणा आयसोलेशान कक्षात दाखल ४ संशयित नागरिकांचे नागपूर येथील प्रयोगशाळेतून रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.      घरामध्ये निगराणीखाली असलेल्या नागरिकांमध्ये आज प्रथमच एकाही नागरिकाची भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज वाढ नाही. 

काल दि. 26 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या 64 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 27 मार्च 2020 रोजी  एकही नवीन नागरिक निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेला नाही. मात्र घरीच 14 दिवसांचे निरीक्षण पूर्ण केलेल्या 3 नागरिकांची निरीक्षणातून सुटका करण्यात आली.  अशाप्रकारे तीन वगळता जिल्ह्यात एकूण 61 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे दोन व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.  


    जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात चार नागरिकांना संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. जिल्हयात आतापर्यंत 84 विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची यापूर्वीच निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 02 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.सौजन्य – Dio बुलडाणा

Related posts

बीएसएफमध्ये निवड झालेल्या युवकांची घोड्यावरुन काढली मिरवणूक…

nirbhid swarajya

कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून दिले शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक

nirbhid swarajya

World’s Best Teens Compete in Microsoft Office World Championship

admin
error: Content is protected !!