November 21, 2025
जिल्हा बातम्या बुलडाणा

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहतील

किराणा, दुध, भाजीपाला, फळे व धान्य दुकान, बेकरी यांचा समावेश


बुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.  अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा त्यामध्ये किराणा, धान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळे व दुध यांची दुकाने वगळता अन्य दुकाने संचारबंदी काळात बंद आहेत. मात्र यामध्ये जिवनावश्यक वस्तूंच्या दुकांनामधील गर्दी अद्यापही कमी झालेली दिसून येत नाही.

कोरोना आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदर ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व किराणा, धान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळे व दूध यांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. तसेच त्याठिकाणी गर्दी होवू याबाबत दक्षता घ्यावी. फळांची व भाजीपाल्यांची दुकाने 100 मीटर अंतराने लावण्यात यावीत. दुकानदारांनी ग्राहकांसाठी प्रत्येक दुकानासमोर 1 मीटर अंतरावर ग्राहक उभे राहतील यादृष्टीने नियोजन करावे. तसेच  ग्रामीण भागामध्ये गटविकास अधिकारी  व नगरपरिषद क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांनी  आदेशाचे तंतोतंत पालन करावे व चुन्याने उभे राहण्याची जागा चिन्हांकित करावी, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आदेशीत केले आहे.                                                           

Related posts

‘तो’ शासननिर्णय रद्द करण्याची मागणी

nirbhid swarajya

खामगाव-जालनाच्या फील्ड सर्वे साठी रेल्वेचे अधिकारी बुलडाणा, जालन्यात दाखल

nirbhid swarajya

हिंदुस्तान लिवर कामगार संघटनेची निवडणुक पडली पार

nirbhid swarajya
error: Content is protected !!