शेगाव : अस्मानी संकटात असलेल्या कोरोना व्हायरस आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केलेला असून या काळात सर्व हॉटेल आणि वाहतुकीचे साधन बंद करण्यात आल्याने रस्त्याच्या कडेला असलेले भिकारी आणि प्रवाशांना शेगाव येथील जमियत उलमा ए हिंद कडून अन्नदान करण्यात आले.जमियत चे संस्थापक अध्यक्ष अर्षद मदनी यांच्या निर्देशानुसार आपापल्या शहरांमध्ये उद्भवलेली परिस्थिती पाहता जमियत उलमा ए हिन्द च्या कार्यकर्त्यांनी समोर येऊन रस्त्याच्या कडेला असलेली भीक मागणारी मंडळी, रेल्वे स्थानक बस स्थानक रुग्णालय परिसरात असलेली गरीब मंडळी आणि आवश्यकता असलेल्या प्रवाशी आणि व्यक्तीजवळ पोहोचून त्यांना जमावबंदीच्या काळामध्ये जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश मिळाल्या नुसार पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे. यावेळी पुलाव तयार करून शेगाव शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, कृषी उत्पन्न बाजार समिती, रुग्णालय परिसर, मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यावर भीक मागणाऱ्या व्यक्तींकडे पोहोचून त्यांना जेवणाचे पॅकेट पुरविण्यात आले. याशिवाय सर्व वाहतुकीची साधने बंद असल्याने रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरात अडकून पडलेल्या मंडळींनाही जेवण वाटप करण्यात आले. याच प्रकारे जमियत उलमा ए हिंद यांचा आदर्श घेऊन ईतर सामाजिक संस्थांनी आपापल्या परिसरातील गरजू व्यक्तींना सहकार्य करावे असे आवाहन निर्भिड स्वराज्य तर्फे करण्यात येत आहे.
next post