January 6, 2025
बातम्या

कोरोना बद्दल जनजागृती करत नवरदेवाने नागरीकांना दिला सतर्कतेचा संदेश

घरगुती विवाह करण्याच्या निर्णयामुळे जनतेपुढे ठेवला आदर्श


अमरावती – वर्धा : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने वाढत्या संसर्गामुळे राज्यभरामध्ये संचार बंदी लागु केली आहे. याच पाश्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातही अनेक उपायोजना करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या कालावधीत होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर देखील कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन अनेक उपायोजना करत आहे मात्र, उन्हाळ्यामध्ये लग्न समारंभाची तिथी दाट असल्यामुळे कोरोनाचा लग्न समारंभावर परिणाम होतांना दिसून येत आहे. कोरोनामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एका जोडप्याने सुद्धा तोंडाला मास्क लावून लग्नाची विधी पार पाडली होती. याचप्रकारे अमरावती येथे एका जोडप्याचे लग्न २५ मार्च रोजी ठरले होते पण कोरोना या विषाणूची साथ पसरली असल्यामुळे आपले लग्न घरगुती पद्धतीने करण्याचे वधू वर व त्यांच्या कुटुंबीयांनी ठरवले आहे.कोरोना पासून बचाव करण्यासाठी जनतेने शासनाच्या आदेशांचे पालन करावे, असा संदेश देत या दाम्पत्याने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.”कोरोना विषाणूला घाबरू नका व शासनाच्या निर्णयाला सहकार्य करून स्वतःचा बचाव करा, सतर्कतेसाठी शासनाकळून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करा”असे सुद्धा वराने सांगितले आहे व या लग्नामुळे सुरक्षतेसोबत समाजातही जनजागृतीचा संदेश जात आहे त्यामुळे या जोडप्याच्या निर्णयाचे सर्वच स्तरावरून भरभरून कौतुक होत आहेत.

Related posts

खामगांव वामन नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे फाटकाचे ठिकाणी भुयारी मार्गास मंजूरात आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश.

nirbhid swarajya

Google Home One-ups Amazon Echo, Now Lets You Call phones

admin

प्रसाद डांगे ची वैद्यकीय शिक्षणाकरीता निवड….

nirbhid swarajya
error: Content is protected !!