January 6, 2025
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकार संत गाडगेबाबांच्या दशसुत्री प्रमाणे काम करेल : मुख्यमंत्री

 
मुंबई : संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री शिकवणीनुसार महा विकास आघाडीचे सरकार काम करेल हा विश्वास दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ केले. दशसूत्रीचा फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील अधिवेशनात केली होती, त्यानुसार या मार्बल शिळेत कोरलेल्या फलकाचे अनावरण करण्यात आले. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना निवारा, अंध पंगु रोग्यांना औषधोपचार, बेरोजगारांना रोजगार, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दुखी व निराशांना हिम्मत या बाबी दशसुत्री मध्ये नमूद आहेत.

Related posts

वंचितच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

nirbhid swarajya

भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय

nirbhid swarajya

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी ज्ञानगंगापूर येथे साजरी

nirbhid swarajya
error: Content is protected !!