November 20, 2025
क्रीडा

आयपीएल १३ वा हंगाम रद्द होणार?


आयपीएलचा १३वा हंगाम येत्या २९ मार्च ते २४ मे या काळात होणार आहे. आयपीएलच्या १३वा हंगाम रद्द करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसचे काही रुग्ण भारतात देखील आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा रद्द करावी अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आयपीएल स्पर्धा घेण्याची परवानगी देऊ नये, असे आदेश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. वकील जी अॅलेक्स बेंजिगर यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती एमएम सुंद्रेश आणि न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठा समोर १२ मार्च रोजी होणार आहे.

Related posts

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा ठाणेदार अमोल बारापात्रे

nirbhid swarajya

अकोला शिवणी विमानतळाला जमीन अधिग्रहणासाठी निधी देण्याची केसरकरांची घोषणा…

nirbhid swarajya

बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मान्सून मॅरेथॉन 9 ऑक्टोबरला….

nirbhid swarajya
error: Content is protected !!