January 7, 2025
बुलडाणा

जिल्ह्यात वारा व अवकाळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट ; गहू, हरभरा पिकाला फटका


‌बुलडाणा – काल बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वाऱ्यासह अवकाळी पावस झाला तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले गहू , हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे व ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावल्या जातो की काय यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. खामगाव तालुक्यातील बोरी- अडगाव, आंबेटाकळी, अंत्रज, लाखनवाडा सह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. ज्यामुळे शेतातील गहू या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील शेंबा परिसरात तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे.

Related posts

मराठा आरक्षणासाठी उद्या डफडे बजाओ आंदोलन

nirbhid swarajya

गो.से.महाविद्यालयाचे रासेयो शिबिर संपन्न…

nirbhid swarajya

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!