April 11, 2025
क्रीडा

भारतावर मोदी सत्ता असेपर्यंत भारत-पाक क्रिकेट मालिका अशक्य

पाकिस्तानकडून भारतावर होत असलेले अतिरेकी हल्ले पाहता भारत सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका गेल्या काही वर्षांपासून बंद आहे.  आयसीसीच्या स्पर्धांचा अपवाद वगळता भारत आणि पाकिस्तान हे संघ क्रिकेट सामने खेळत नाहीत. काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्याची गरज असल्याचं मत अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं होतं. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या काही वेगळच मत उमटनांना दिसले.“जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत भारत-पाक क्रिकेट मालिका शक्य नाही. भारत प्रतिसाद देणार नाही. मोदी प्रचंड नकारात्मक विचार करतात, आणि माझ्या मते आपल्यासकट अनेक भारतीयांनाही याची कल्पना आहे. केवळ एका व्यक्तीमुळे भारत-पाक देशांमधले संबंध बिघडत आहेत. दोन्ही देशांमधली लोकं हे एकमेकांच्या देशात यायला-जायला तयार आहेत. पण मोदींना नेमकं काय हवंय हेच समजत नाहीये.” शाहिद आफ्रिदी पाकिस्तान मधील सुपर लिग स्पर्धेच्या एका सामन्यात उपस्थित पत्रकारांशी बोलत होता.

Related posts

तलवारबाजी स्पर्धेत अनुराधा सोळंकी ची यश

nirbhid swarajya

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेकरिता विधी पहुरकरची निवड

nirbhid swarajya

आज गोविंदा दहीहंडी फोडणार…

nirbhid swarajya
error: Content is protected !!