April 18, 2025
बुलडाणा

‘श्रीं’ चा १४२ वा प्रकट दिन शेकडो दिंड्या विदर्भपंढरीत दाखल,भाविकांची गर्दी, संस्थानकडून जय्यत तयारी….


श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ‘श्रीं’ चा  १४२ वा प्रकट दिनोत्सव १५ फेब्रुवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीभाव व उत्साही वातावरणात साजरा होत आहे. या प्रकट दिनानिमित्त ९ फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत होत आहे.श्रींच्या प्रकट दिनानिमित्त संस्थानच्यावतीने ९ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये   काकड आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे दैनिक कार्यक्रम सध्या होत आहेत. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींच्या प्रगट दीना निमित्त कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी १0 वाजता यज्ञाची पूर्णाहूती होईल.  दुपारी दोन वाजता श्रींच्या पालखीची रथ, मेणा, गज, अश्‍वासह नगर परिक्रमा निघेल. यानंतर १६ फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन होऊन उत्सवाची समाप्ती होणार आहे.दरम्यान, मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, मंदिराकडे जाणारा रस्ता एकेरी करण्यात आला आला आहे.  त्यात दर्शनबारी व श्री मुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग तसेच औदुंबराची दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि मदिंर परिसर केळीच्या खांबांनी सजविण्यात येणार आहे. भक्तांच्या सोयीसाठीसंस्थानच्यावतीने सर्वतोपरी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सेवाधारी वर्ग आपली सेवा पूर्ण करीत आहे.Attachments area

Related posts

खामगावकरांनो सावधान तालुक्यात दुर्मिळ ‘स्क्रब टायफस’ आजाराचा शिरकाव

nirbhid swarajya

जलंब पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा महापूर…

nirbhid swarajya

महाराष्ट्रातील ३७ आयपीएस व ५४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!