January 6, 2025
बातम्या

प्रेमप्रकरणातून युवकाचा खून , प्रेयसी कडील मंडळीविरुद्ध 8 आरोपींविरुद्ध गुन्हा, दोन आरोपी अटक तर सहा फरार, संग्रामपूर तालुक्यातील घटना.

बुलढाणा : संग्रामपूर  तालुक्यातील सावळा येथील एका तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने आणि काठीच्या सहाय्याने खून केल्याची घटना  रात्री दरम्यान घडलीय… हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आलीय.. . दरम्यान, या खुनामुळे तालुक्यात खळबळ उडालीय ..बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सावळा येथील घडलेल्या घटनेची मिळालेली  माहितीनुसार, ज्ञानेश्वर देवेंद्र घिवे (वय ३५, रा. सावळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून  हया युवकाचे मागील दोन वर्षपासून घराशेजारील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते .. तर रात्री मृतक ज्ञानेश्वर हा त्याच्या प्रेयसीच्या घरात सापडल्याने त्याला प्रेयसीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केलीय .. या मारहाणीत त्याचा आज सकाळी रुग्णालयात मृत्यू झालाय ..अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीय.. तर  फिर्यादी देवेंद्र रामनाथ घिवे रा . सावळा याच्या फिर्यादीवरून आरोपी – 1 . प्रभाकर महादेव धुळ 2 . गजानन महादेव धुळ 3 . अजाबराव महादेव धूळ 4 . गणेश प्रभाकर धुळ 5 . प्रकाश गजानन धुळ 6 . रामराव अजाबराव धुळ 7 . विठ्ठल अजाबराव धुळ 8 . ज्ञानेश्वर मनोहर धुळ सर्व रा . सावळा ता संग्रामपुर यांच्याविरोधात तामगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय …   

मृतक ज्ञानेश्वर घिवे याचे आरोपी प्रभाकर धूळ यांच्या मुलीसोबत मागील 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते .. रात्री मृतक ज्ञानेश्वर हा प्रेयसीच्या घरात घुसल्याने आरोपीने पाहिले आणि त्याला घरातून बाहेर काढत कुऱ्हाडीचे दांड्याने आणि काठीने बेदम मारहाण केलीय.. मृतक यास उपचाराकरीता सरकारी दवाखाना शेगांव येथे भरती केले असता तो मरण पावला ..  याप्रकरणी युवकाचा आठ जणांनी निर्घृण खून केला असल्याने घटनेनंतर मृतकाचे वडील देवेंद्र रामनाथ घिवे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यानुसार  आठ जणांविरुद्ध भादवी. कलम ३०२,१४३,१४७,१४८,१४९ यानुसार गुन्हा दाखल करून दोन आरोपीना या प्रकरणी अटक करण्यात आलीय.. आणि 6 आरोपी अद्यापही फरार आहेत .. गणेश प्रभाकर धूळ आणि ज्ञानेश्वर प्रभाकर धूळ हे दोघे जण पोलीस ताब्यात आहेय.. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडालीय .. 

Related posts

मराठा पाटील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा…

nirbhid swarajya

संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे ६ जून रोजी प्रस्थान

nirbhid swarajya

पोलीस पत्नी व चिमुकल्या मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या…

nirbhid swarajya
error: Content is protected !!