ॲलोपॅथीच्या जास्त सेवनाने मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात त्यामूळे आयुर्वेदाचा आणि नॅचरल थेरिपी चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रकृती नॅचरल थेरिपी क्लिनिक यांच्या अनुषंघाने अडसूड येथे मोफत शिबिर राबविले गेले.अडसूड डिसेंबर : अनेक आजारांवर मुळापासून उपचार करुन त्यावर योग्य उपचार म्हणून आयुर्वेदाची मदत घेण्यात येते त्यामुळे प्रकृती नॅचुरल थेरिपी क्लिनिक ने आयुर्वेदाबद्दल माहिती देऊन त्याचे फायदे सांगून मार्गदर्शन केले यामध्ये डॉ. उमेश साळवे, डॉ. प्रतीक धामणे, डॉ.गोपाळ हावरे डॉ.चेतन सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची मोफत तपासणी केली गेली. सकाळी 11 वाजता अडसूड येथील ग्रामपंचायत भवन मध्ये अडसूड च्या सरपंच सुनीता वानखेडे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यामध्ये शनिवारी अडसूड तालुका शेगाव येथे प्रकृती नॅचरल थेरिपी क्लिनिक (खामगाव)चे डॉ. निलेश बेनोडेकर व डॉ. प्रेरणा बेनोडेकर यांनी आयुर्वेदाबद्दल माहीती देऊन मोफत तपासणी सुद्धा केली, तर शिबिराचे उद्घाटन सकाळी 11 वा अडसूड येथिल ग्रामपंचायत भवन वर पार पडले आणि पूर्ण दिवस या शिबिरामधून मोफत तपासण्या करण्यात आल्या.या उद्घाटन कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी INO दिल्ली येथील महाराष्ट्राचे प्रवक्ता नारायण अंभोरे हे प्रमुख मार्गदर्शक होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अडसूड चे सरपंच सुनीता वानखेडे उप सरपंच गौतम इंगळे अडसूड चे ग्रामसेवक विश्वासराव देशमुख, नगरसेवक वर्षा पातळे आणि समस्त पातळे, ठाकरे,भटकर, दाभाडेपरिवार यांची उपस्थिती होती.