November 21, 2025
बुलडाणा

सामान्य रुग्णालयाकडून होणार स्त्री जन्माचे स्वागत मकरसंक्रांतीनिमित्‍त दिले सकस आहाराचे वाण..!!


मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेता शासनाकडून या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर स्त्रीजन्माचे स्वागत करत कन्या रत्नाचा जन्म दिलेल्या माता आणि तिच्या लेकी चा साडी चोळी आणि झबला टोपी देऊन बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव सामान्य रुग्णालयाकडून सन्मान करण्यात आला. या विधायक उपक्रमाने या शासनाच्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच हा उपक्रम अविरत सुरु राहील हे विशेष..!!बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचार्यांकडून स्त्री जन्माचा टक्का वाढवण्याच्या हेतूने मुलीला जन्म देणाऱ्या मातेचा आणि त्या मुलीचा साडीचोळी ,झबला टोपी ,आणि सकस आहाराचे वाण देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर अश्या मायलेकींचा दर आठवड्याला सन्मान होणार असून या उपक्रमाची सुरुवात परिचरिकांनी स्वयंस्फूर्तीने केली आहे , तर दर बुधवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सामाजिक संस्थांकडून देखील पुढाकार घेतला जातोय, सामान्य रुग्णालयाकडून महिला प्रसूती कक्षात महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी महान स्त्रियांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत, या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. खामगाव सामान्‍य रुग्‍णालयात या अभिनव उपक्रमाचे उद्‌घाटन नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्‍या हस्‍ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. निलेश टापरे, डॉ. सुलेखा मेंढे यांच्‍यासह मान्‍यवरांची उपस्‍थिती होती. स्‍त्री जन्‍मदरात बुलडाणा जिल्‍हा रेडझोनमध्ये असल्‍याने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत आजपासून दर बुधवारी सामान्‍य रुग्‍णालयात कन्‍या जन्‍माचे स्‍वागत या पध्दतीने केले जाईल अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी याप्रसंगी दिली.  सामान्‍य रुग्‍णालयाचा हा उपक्रम प्रशंसनिय असून सामाजिक संस्‍थांनी या उपक्रमात सहभाग घ्यावे असे आवाहन करत येत्‍या या उपक्रमासाठी आपण सहकार्यक करणार असल्‍याचे नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी सागितले. त्‍यानंतर सर्व मातांना साडी, चोळी झबला व सकस आहाराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी सामान्‍य रुग्‍णालयातील परिचारीका सुमित्रा राऊत गवळी, कमल पद्मने, सरला झोडपे, माया वानखडे, रेखा खडबडे, बाली वासनकर, मिरा घाटे, माधुरी मोरे, अर्चना नारे, श्रध्दा मोहनकर यांनी पुढाकार घेतला. प्रसुती रुग्‍ण कक्षात थोर महिलांच्‍या प्रतिमा समाजाच्‍या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेल्‍या थोर क्रांतीकारी महिलांच्‍या प्रतिमा सामान्‍य रुग्‍णालयातील प्रसुती कक्षात लावण्यात आल्‍या आहेत. त्‍यामध्ये राजमाता जिजाऊ, क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले, आद्यमहिला पत्रकार तानुबाई बिर्जे, झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्‍यासह विविध कार्यक्षेत्रात नावलौकिक केलेल्‍या महिलांच्‍या प्रतिमा प्रेरणादायी ठरतील आणि मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश जाईल असा या मागचा हेतू आहे.स्‍त्रीभ्रुण हत्‍येला आळा बसावा तसेच मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा उपक्रम आणखी प्रभावीपणे समाजात पोहचला पाहिजे. या करिता मकर संक्रांतीपासून कन्‍या जन्‍माचे स्‍वागत करण्याचा उपक्रम परिचारीकांच्‍या पुढाकारातून राबविल्‍ाा जात आहे. काल या उपक्रमाला सुरुवात झाली. समाजसेवी संघटनांना या उपक्रमात सहभागी व्‍हायचे असल्‍यास त्‍यांचे सुध्दा स्‍वागत आहे.

Related posts

दुचाकी वाहनाच्या धडकेत महिला ठार दोन जण जखमी

nirbhid swarajya

तर मिरवणुका, आंदोलने, सभा ‘या’ कारणामुळे रद्द होणार

nirbhid swarajya

तलवारबाजी स्पर्धेत अनुराधा सोळंकी ची यश

nirbhid swarajya
error: Content is protected !!