मनसेचा न.प.मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे इशारा
खामगाव : शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता दरवर्षी खामगाव नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट दिल्या जातो त्यामध्ये अनेक वर्षापासून त्रेपन घंटा गाड्या व काही ट्रॅक्टरचा समावेश असतो परंतु मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात खामगाव नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट काढताना त्रेपन एवजी चाळीस घंटा गाड्यांचा व काही ट्रॅक्टरचा समावेश केला आहे खामगाव शहराची वाढत असलेली लोकसंख्या पाहता त्रेपन घंटा गाड्या सुद्धा घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता कमी पडतात अशा परिस्थितीत खामगाव न.प. मुख्याधिकारी यांनी त्रेपन पेक्षा जास्त घंटागाड्याचा घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट काढताना समावेश करायला पाहिजे होता परंतु त्यांनी तसे केले तर नाहीच उलट त्रेपन घंटा गाड्यांमधूनही तेरा घंटा गाड्या कमी केल्या आता चाळीस घंटा गाड्यावर खामगाव शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची जबाबदारी आहे पन खामगाव शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे होत नाही. खामगावातील कचरा गोळा करण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदार एस आर ग्रीनवे एम्पायर यांच्याकडे आहे परंतु संबंधित कंत्राटदार स्वतःच्या आर्थिक फायदा करिता चाळीस घंटागाड्याऐवजी फक्त दहा ते बाराच घंटागाड्या चालवत असल्यामुळे खामगाव शहरातील नागरिकांना घरातील जमा झालेला कचरा नाईलाजास्तव रस्त्यावर आणून टाकावा लागत आहे म्हणून शहरातील अनेक भागत ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले दिसून येतात यामुळे खामगावकरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते म्हणून त्वरित बंद केलेल्या तेरा घंटागाड्या पुन्हा सुरू कराव्या व स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चाळीस एवजी फक्त दहा ते बाराच घंटा गाड्या संबंधित ठेकेदार चालवत असल्यामुळे तसेच चांदमारी भागातील टेकडीवर संबंधित ठेकेदाराने मनमर्जीप्रमाणे नवीन अवैध डंपिंग ग्राउंड तयार केल्याने व घंटागाडी कामगारांना किमान वेतनुसार पगार देत नाही खामगाव नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्वरित संबंधित ठेकेदाराला कळ्या यादीत टाकून त्यांचे कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये यासह विविध मागण्या चे निवेदन मनसेच्या वतीने खामगाव नगरपालिकेला आज दिले आहे निवेदनात नमूद मुद्यांवर कार्यवाही झाली नाही तर न.प.समोर २९ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुध्दा करण्यात येणार आहे या उपोषणाची सर्व जबाबदारी न.प.ची राहील असेही निवेदनात नमूद आहे.

कचरा गोळा करणारी घंटागाडी येत नसल्यास नागरीकांनी संपर्क साधावा
खामगाव शहरातील सर्व भागात दररोज घंटागाडी जाने बंधनकारक आहे परंतु अनेक भागात एक किंवा दोन दिवस आड घंटागाडी जाते तर काही भागात घंटागाडी जातच नाही अश्या भागातील त्रस्त नागरिकांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या मो.नंबर वर संपर्क साधावा मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी अश्या नागरिकांना स्व खर्चाने घरपोच येऊन तक्रार लिहून देतील तसेच ती तक्रार स्वताहून नगरपालिकेकडे सुपूर्त सुध्दा करतील
फक्त शहरातील नागरिकांनी घंटागाडी येत नसल्यास तक्रार करण्याकरिता पुढे यायचे आहे व खालील नंबर संपर्क साधावा हि विनंती
आनंद गायगोळ 9561675307
आकाश पाटील 8888308295
विनोद इंगळे 7768912714
सागर भोपळे 9922892814
विक्की शिंदे 8857056855
