November 20, 2025
खामगाव जिल्हा नागपुर पुणे बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ विविध लेख शेगांव सामाजिक

खामगावात साहित्य संमेलन भरविणार आ.आकाश फुंडकर यांचे आश्वासन

दस्तुर रतनजी ग्रंथालया तर्फे वाढदिवसा निमित्त सत्कार

खामगाव : शतकोत्तर वर्षांची परंपरा लाभलेल्या येथील दस्तुर रतनजी ग्रंथालयाच्या वतीने आमदार .अँड आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना खामगाव शहरात भव्य दिव्य साहित्य संमेलन भरवण्याची ग्वाही देऊन त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार फुंडकर यांनी ग्रंथालय पदाधिकाऱ्यांना दिले.खामगावात शतकोत्तर म्हणजेच सुमारे १३४ वर्षापासून कार्यरत दस्तुर रतनजी ग्रंथालयाच्या माध्यमातून रजत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहराची साहित्य क्षेत्रात ही ओळख आहे.त्यामुळे ग्रंथालयाच्या माध्यमातून शहरात भव्य दिव्य साहित्य संमेलन व्हावे अशी अपेक्षा ग्रंथालयाचे अध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार व पदाधिकारी यांनी आमदार फुंडकर यांच्याकडे व्यक्त केली तेव्हा त्यांनी साहित्य संमेलन भरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही देऊन त्याला मूर्त स्वरूप देण्याचे आश्वासन दिले. सर्वप्रथम आमदार फुंडकर यांचे विठ्ठलराव लोखंडकार यांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन व आमदार फुंडकर यांचे हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष शशिकांत भारंबे,सचिव अनंत वनारे,सहसचिव गजानन आखरे,संचालक वसंतराव बेलोकार,राजीव वानखडे,श्रीकांत वैद्य,चंदन कौशल्य,सचिन तांबट, खामगाव तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवा भाऊ लोखंडकार व्यवस्थापक मनोहर बोराडे,ग्रंथपाल राधिका ढोरे सहग्रंथपाल मंगेश बदरखे,लिपिक लताताई विंचू,सेवक रवींद्र खराटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राम भेलके तर आभार विठ्ठलराव लोखंडकर यांनी व्यक्त केले.

Related posts

कर्नाटकातील घटनेच्‍या निषेर्धाथ मराठा महासंघाचे आक्रोष आंदोलन

nirbhid swarajya

बुलढाणा उपजिल्हाधिकारी, लिपिक व एका वकिलाला एक लाखाची लाच स्वीकारतांना बुलडाणा एसीबी जाळ्यात…

nirbhid swarajya

अर्धवट डिग्री लिहून रुग्णांची डॉक्टरांकडून दिशाभूल

nirbhid swarajya
error: Content is protected !!