November 21, 2025
अमरावती खामगाव गुन्हेगारी जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अवैध रेती वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले..

अपर पोलिस अधीक्षक पथकाची कारवाई…

खामगाव : रेतीची तस्करी करणारे २ टिप्पर अप्पर पोलिस अधिक्षक पथकाने तालुक्यातील मोमिनाबाद येथे पकडले असून ४ ब्रास रेतीसह दोन्ही टिप्पर जप्त करण्यात आले आहे. अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांच्या पथकातील सपोनि सतिष आडे यांनी त्यांच्या पथकासह मोमीनाबाद येथे पाण्याच्या टाकी जवळ अशोक लेलँड कंपनीचे निळ्या रंगाचे टिप्पर क्रमांक एमच २८-EE- १५९० व तसेच अशोक लेलँड कंपनीचे पिवळ्या रंगाचे टिप्पर विनानंबर है दोन्ही रेतीचे टिप्पर थांबवून चालकास रॉयल्टी बाबत विचारणा केली असता दोन्ही चालकाकडे शासनाची रॉयल्टी आढळून आली नाही. दोघे जण गौण खनिज रेतीची चोरटी वाहतुक करीत असतांना मिळून आले. त्यामुळे सदर दोन्हीं टिप्पर व ४ ब्रास रेती असा एकूण ३३,२०,०००/- रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी टिप्पर चालक सचिन रघुनाथ कांडेलकर (२९) रा. दाताळा ता. मलकापुर व शेख अन्सार शेख शकुर (३०) रा. उमाळी ता. मलकापुर या दोघांविरुद्ध नांदुरा पोलिस स्टेशनला कलम ३७९ भा.द.वि.सह क. १५८/१७७, ३(१) / १८१, ५/१८०, ५० / १७७ मो.वा.का. नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक बुलढाणा सुनिल कडासणे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांचे आदेशाने पथकातील सपोनि सतिष आडे, पो.हे.कॉ. सुधाकर थोरात, निलेश चिंचोळकर, पो. कॉ. शिवशंकर वायाळ, पो. कॉ. हिरा परसुवाले यांनी केली.

Related posts

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोड मध्ये

nirbhid swarajya

Apple 12.9-inch iPad Pro and Microsoft Surface Pro Comparison

admin

भूमिहीन व अतिक्रमण धारकांना वंचित कडून आवाहन

nirbhid swarajya
error: Content is protected !!